शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू होऊनही अद्याप पुस्तकांचे वाटप नाही

By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST

माजलगाव: माजलगाव : शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळणार या शासनाचे आदेशाला येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने हरताळ फासला आहे.

माजलगाव: माजलगाव : शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळणार या शासनाचे आदेशाला येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने हरताळ फासला आहे. शाळा सुरु होऊन आठ दिवस उलटले तरी शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुस्तके न पोहोचल्याने तसेच त्याचे वितरण न झाल्याने शाळांमध्ये अद्याप अभ्यासाला सुरुवात झालेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याचे पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप होईल असे आदेश आहेत. त्याप्रमाणे दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी घोषणा करण्यात येते परंतु यावर्षी पहिली ते आठवी इयत्तेच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांच्या पुस्तकांचे कधीच वाटप होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी काही विषयांची पुस्तके बाजारातून खरेदी करावी लागतात. यंदाही शाळा सुरु झाल्या त्यापूर्वी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे काही विषयांची अर्धवट प्रमाणात पुस्तके पाठविण्यात आली. काही शाळांना त्याचे वाटप करण्यात आले परंतु अर्धवट पुस्तके काही शाळात व काही विषयांचीच गेल्याने शाळांनीही त्याचे वाटप केले नाही.शहरासह ग्रामीण भागातील कोथरुळसह अनेक शाळांमध्ये पुस्तके वितरीत केली गेली नाहीत. त्यामुळे आठ दिवसानंतरही शाळामध्ये अभ्यासक्रमास सुरुवात झालेली नाही अअसे चित्र दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालकांमधून होत आहे. (वार्ताहर)