शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना जीवदान

By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST

लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़

लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़ लातूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वदुर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे ओढे दुथडी भरून वाहत आहेत़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीत तब्बल दीड मीटरने वाढ झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न किमान तीन महिन्यांसाठी सुटणार आहे़ निलंगा तालुक्यातील कासारसिरसी येथील ओढ्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे़ जिल्ह्यात ४१़२४ मी़मी़ पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद चाकूर तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळात १७० मी़मी़ झाली आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहजानी येथील तेरणा नदी वाहू लागली आहे़ उदगीर तालुक्यातील ४ तलावांना भगदाड पडले आहे़ लातूर, औसा, रेणापूर, जळकोट तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या विविध कार्यालयात पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे़ दिवसभर पाणी गळती सुरूच होती़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात ४१़२४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात ७४ मि़मी़ झाला आहे़ शिरूरअनंतपाळ ५१़३३, निलंगा ४८़६३, उदगीर ४९़५७, रेणापूर ३६़५०, जळकोट ३३़ ५०, देवणी ३८, औसा २३़१४, लातूर तालुक्यात २८़८८ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यावर्षीच्या पावसाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ पिके कोमेजून जात असताना पावसाने दिलेला दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरला आहे़ ४लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा वाढला आहे़ जवळपास दीड मीटरने पाणी पातळीत वाढ झाली असून, लातूरकरांना तीन महिने पुरेल इतके पाणी सध्यातरी उपलब्ध झाले असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आऱएस़ सोनकांबळे यांनी दिली़ अजूनही मांजरा धरणात पाणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले़