शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजला नळांद्वारे येतेय अळ्यांयुक्त दूषित पाणी

By admin | Updated: May 28, 2014 01:14 IST

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाळूजवासीयांना आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही अपुरे. काही खाजगी कंपन्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेत असल्या तरी त्यात गावातील काही वरिष्ठ मंडळी आडकाठी आणत आहेत. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. नळांद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असून पाण्याला उग्र वासही आहे. दूषित पाण्याची तक्रार देण्यासाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर गेले असता ते बंद होते. त्यांनी सरपंच रंजना भोंड यांना दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ पाहणी करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले. तरीही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोष जलशुद्धी केंद्रात गावाला एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असल्याने हे पाणी बंद करून स्वच्छ पाणी सोडण्यास सांगितले आहे. यात ग्रामपंचायतीचा दोष नसून एमआयडीसीचा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असून, त्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. बहुतेक एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रातच दोष असून शकतो, असे वाळूजच्या सरपंच रंजना भोंड यांनी सांगितले. (लोकमत ब्युरो) ग्रा.पं.चे दुर्लक्ष पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व कचरा असून दुर्गंधीही येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अनेक वेळा सांगूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. -संदीप पठारे, रहिवासी आरोग्याला धोका आठवड्यातून एकदा पाणी मिळते; पण ते अळ्यायुक्त व दूषित असते. पाणीटंचाई व ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आजार पसरण्याची शक्यता आहे. -नदीम झुमरवाला, रहिवासी