शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी सहायक घरी, सल्ला वार्‍यावरी’

By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST

कडा: शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

 कडा: शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अनेक कृषी सहायक गावात जातच नसल्याने शेतकर्‍यांना सल्ला मिळत नाही. यामुळे अशिक्षित शेतकर्‍यांची पंचाईत होत आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजना योग्य प्रकारे राबविल्या जात आहेत का याची पाहणीसह इतर उद्देशाने कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात तब्बल ४४ कृषी सहायकांची नेमणूक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या गावांमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे , शासनाच्या योजनांची माहिती देणे असा या मागचा उद्देश असला तरी कृषी सहायक मात्र आठवड्यातून एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले. यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. तालुक्यातील ४४ पैकी अनेक कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून एखादेवेळीे गावात जाता व ठराविक शेतकर्‍यांचीच भेट घेतात. यामुळे इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहायक शोधावा लागतो. वेळेवर कृषी सहायक मिळत नसल्याने त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नसल्याचे संजय खंडागळे यांनी सांगितले. तालुक्यात अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन कृषी सहायकांना संबंधित गावातच रहावे व त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी सचिन वाघुले यांनी केली आहे. तसेच जे कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतर ठिकाणी राहून आपला कारभार हाकतात अशांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात आष्टी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी पी.के. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, जे कृषी सहायक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत नाहीत किंवा मुख्यालयी राहत नाही, अशांची लेखी तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. (वार्ताहर)