शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:52 IST

माणुसकीच्या नात्याने परक्यांनी दिले जीवदान; माणसांचा सहवास नसल्याने शब्दांचा उच्चारच विसरली, बाल कल्याण समितीकडून उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगरआईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद रिहाना (नाव बदलले आहे) वडिलांच्या अमानुष वागणुकीची शिकार झाली. बीड जिल्ह्यातील एका गावात तिच्या व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, सोमवारी रिहानाचा दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला.

रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती गेवराईची होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नाही. ती बोलू शकत नव्हती. दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले.

अचानक बदलामुळे रिहानाचे वागणे बदललेहिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला. अधिक हिंस्त्र झाली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी धाव घेत तिला ताब्यात घेतले.

बदल होतोयउपचार, समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर