शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

एक तपानंतर टँकरची संख्या घटली

By admin | Updated: May 26, 2014 00:32 IST

जालना : जिल्ह्यात एक तपानंतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या बारा वर्षात किमान ३५ तर कमाल ५५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला.

 जालना : जिल्ह्यात एक तपानंतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या बारा वर्षात किमान ३५ तर कमाल ५५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला. मात्र यावर्षी केवळ सहाच टँकर सुरू असल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. उन्हाळा आणि पाणीटंचाई असे जालना जिल्ह्याचे समीकरणच झाले होते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यातील टंचाईला तोंड देताना प्रशासकीय यंत्रणेला नाकीनऊ येत असत. टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे किंवा त्या परिसरातील विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न होत होता. गतवर्षी महाराष्ट्रात भयावह दुष्काळाची स्थिती जिल्ह्यातच होती. पाणी कोठून आणावे, असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २४ साठवण तलावात २४ चर खोदले. जाफराबाद येथे तात्पुरत्या पूरक नळयोजनेमुळे ३९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य झाले. निम्न दुधना प्रकल्पात चर खोदून परतूर व मंठा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करता आला. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने खोलीकरण व आडवे बोअर घेण्यात आल्याने व यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने तलावांची, जलाशयांची पाणी पातळी वाढली. ही पातळी वाढल्याने तलावांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस देखील पाणी साठा आढळून येत आहे. अन्यथा एप्रिलमध्येच बहुसंख्य तलाव कोरडे पडतात. विशेषत: घाणेवाडी जलाशयातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्याने या जलाशयात १३ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे जालनेकरांच्या पाण्याचा मूळ स्त्रोत अद्याप सुरक्षित असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. (प्रतिनिधी)जालना नगरपालिकेने घाणेवाडी जलाशयात चर खोदल्याने तेथून दररोज किमान ८० टँकरद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. गतवर्षी दुष्काळात चर खोदणे, आडवे बोअर घेणे अशा विविध उपाययोजनांमुळे तसेच पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे यावर्षी टंचाईची स्थिती कमी प्रमाणात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षनिहाय पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या वर्ष टँकर संख्या २००७-०८ २०१ २००८ -०९ २४३ २००९ -१० १५० २०१० -११ ०३५ २०११-१२ १०३ २०१२-१३ ५५२ २०१३-१४ ००६ (२३ मे पर्यंत)