शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य वाळूतस्करांपुढे प्रशासन हतबल

By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST

अंबड : तालुक्यातील गोदाकाठच्या ग्रामस्थांनी सलग दोन दिवस रास्ता रोको करुनही गोदापात्रातील वाळू तस्करी अद्यापही बंद होऊ शकलेली नाही.

अंबड : तालुक्यातील गोदाकाठच्या ग्रामस्थांनी सलग दोन दिवस रास्ता रोको करुनही गोदापात्रातील वाळू तस्करी अद्यापही बंद होऊ शकलेली नाही. बलाढ्य वाळू तस्करांपुढे हतबल प्रशासनाने गुडघे टेकल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. सलग दोन दिवस रास्ता रोको केल्यानंतरही अवैध वाळू तस्करी बंद होत नसेल तर आम्ही नेमके काय करावे असा संतप्त सवाल साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ विचारत आहेत.अंबड तालुक्यात सध्या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. बाहुबली तस्कर सामान्य नागरिक, महसूल व पोलीस प्रशासन यापैकी कोणालाही जुमानण्यास तयार नाहीत. बेसुमार वाळू उपशामुळे गोदापात्राची अक्षरश: चाळणी झाली आहे. अवैध वाळू उपशामुळे गोदाकाठच्या गावांना अनेक दुष्परिणामांबरोबरच पाणी पातळी खालावणे तसेच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २५ व २६ जून असे सलग दोन दिवस अवैध वाळू उपशा विरोधात साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. बुधवारी भल्या पहाटेच्या अंधारात वाळू तस्करी करणारी वाहने ग्रामस्थांनी अडवून रस्त्यावर ठिय्या मांडला. ग्रामस्थांनी यावेळी क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारी ओव्हरलोड पाच वाहने पकडली. ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती कळताच महसूल पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सर्व वाहने शहागड पोलीसांच्या ताब्यात दिली. मात्र या कारवाईने वाळू तस्करांना काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा एकदा वाळू तस्करी सुरु असल्याचे पाहून साष्टपिंपळगाव मधील संतप्त महिलांनी पुन्हा एकदा रास्ता रोको करत वाळू वाहतुक करणारी वाहने अडवली. वाळू तस्करी विरोधात साष्टपिंपळगावातील सामान्य महिला रस्त्यावर उतरल्याचे समजताच नायब तहसीलदार व्ही.बी.मते व इतरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी नायब तहसीलदारांनी वाळू तस्करीविरोधात कारवाईचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याच्या घटनेस चार दिवस उलटूनही वाळू तस्करांविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यापूर्वीही गोदाकाठच्या अनेक गावातील नागरिकांनी वाळू वाहतुकीस विरोध केला. त्याविरोधात आंदोलने केली. मात्र बलाढ्य वाळू तस्करांपुढे नागरिकांचा विरोध मोडून काढण्यात आला. माध्यमांमध्ये वाळू तस्करीविरोधात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर, नागरिकांनी वाळू तस्करीच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासन कारवाईच्या नावाखाली वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करते. पकडलेल्या या वाहनांना दंड आकारण्यात येऊन ही वाहने सोडण्यात येतात. मोठी कारवाई केल्याचा आव आणत अधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेतात. मात्र ही केवळ वरवरची कारवाई ठरते. दुसऱ्या दिवशी वाळू तस्करांची वाहने सुसाट वेगाने तालुक्यातील रस्त्यांवरुन वाळू वाहतूक करताना दिसतात. वाळू तस्करीच्या झाडाच्या अशा फांद्या छाटण्यापेक्षा प्रशासन याच्या मुळावरच घाव का घालत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यापेक्षा ज्या ठिकाणाहून ही वाळू वाहनांत भरण्यात येते त्या वाळूपट्टयांवर कारवाई करण्याची खरी गरज आहे. वाळूचा ठेका देताना शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याचे लेखी आश्वासन ठेकेदाराकडुन प्रशासनाने घेतलेले असते. वाळू उपसा करताना तो केवळ मजुरांकडूनच करण्यात येईल, वाळू उपशासाठी पोकलेन,, बोटी अशा मशिनरींना बंदी राहील असेही यात नमूद करण्यात आलेले असते. मात्र बहुतांश सर्वच ठेकेदारांकडून या अटींचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येते. गोदापात्राची पाहणी केल्यास वाळू तस्करांनी तीन फुटाऐवजी तीस-तीस, चाळीस-चाळीस फुटांचे खड्डे नदीपात्रात केल्याचे पाहावयास मिळतील अशी माहिती साष्टपिंपळगावातील नागरिकांनी दिली. वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)मजुराच्या मृत्यूनंतरही प्रशासनाचे दुर्लक्षसाष्टपिंपळगाव येथील वाळूपट्ट्यात तर रात्रीच्या अवैध वाळू उपशावेळी महाकाय पोकलेनखाली चिरडून मजुरांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. एवढी मोठी घटना घडल्यानंतर काही कालावधी जावू दिल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा वाळू उपसा सुरु करण्यात आला. काही संवेदनशून्य व भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे वाळू तस्करांना अभय व बळ मिळत असल्याचे रास्ता रोकोच्या वेळी नागरिकांनी सांगितले.प्रशासनाने ट्रकचालकांऐवजी ठेकेदारावर कारवाई हवीअद्यापही प्रशासनाने याविषयी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाने वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांवर थातुरमातुर कारवाई करण्याऐवजी वाळु पटटयांच्या ठेकेदारांवर कारवाई करावी. प्रशासनाने वाळुपट्ट्यांची पाहणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशी माहिती गोदाकाठच्या नागरिकांनी दिली. वाळु तस्करांवर कारवाईसाठी लागणारी आवश्यक इच्छाशक्ती प्रशासनाकडे आहे का हा खरा प्रश्न आहे.