शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांच्या मतदारसंघात 'आदित्य'चा शिवसंवाद; दोन दिवस औरंगाबादेत यात्रा, मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:56 IST

मुंबईत पहिल्या टप्प्यात यात्रा झाल्यानंतर आता मराठवाड्यातील राजधानी व बंडखोरीपूर्वी शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये २२ जुलैला ते येत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ही बंडखोरी जिव्हारी लागल्यामुळे जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे २२ जुलै रोजी शिवसंवाद यात्रा काढून बंडखोरांना आव्हान देणार आहेत.

वैजापूर, बिडकीन, औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघात ही यात्रा असून २२ रोजी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे आदित्य यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. बैठकीला माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषि खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीला चार ते पाच माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. शिवसेनेला २१ जूनपासून बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आमदार, खासदार, शिवसेना नेते, नगरसेवक पक्ष सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान जिल्हा युवा अधिकारी शिंदे यांनी सांगितले, पूर्ण ताकदीने शिवसंवाद यात्रेची तयारी सुरू आहे.

या ठिकाणी जाणार शिवसंवाद यात्रामुंबईत पहिल्या टप्प्यात यात्रा झाल्यानंतर आता मराठवाड्यातील राजधानी व बंडखोरीपूर्वी शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये २२ जुलैला ते येत आहेत. दुपारी १ वाजता वैजापूर, ४ वा. खुलताबाद, ६ वा. संत एकनाथ रंगमंदिरात मेळावा ते घेतील. २३ जुलै रोजी सकाळी १० वा. पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे तर ११.३० वा.गंगापूर मतदारसंघात त्यांची शिवसंवाद यात्रा जाईल. आ.रमेश बोरणारे, आ. प्रदीप जैस्वाल. आ.संजय शिरसाट, आ.संदिपान भुमरे, आ.अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. जिल्ह्यात मागील साडेतीन दशकांत शिवसेनेला कधी नव्हे एवढे मोठे यश २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले होते. सध्या जिल्ह्यात शिवसेनेकडे फक्त कन्नडचे आ. राजपूत आहेत. लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघाचे गतवैभव मिळविण्यासाठी शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद