जिल्ह्यात ३२ कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:46+5:302021-02-05T04:12:46+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर गेल्या २४ तासांत एकही मृत्यूची नोंद झाली नसून २१ जणांचे ...

जिल्ह्यात ३२ कोरोना बाधितांची भर
औरंगाबाद : जिल्ह्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर गेल्या २४ तासांत एकही मृत्यूची नोंद झाली नसून २१ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली.
आजपर्यंत ४५ हजार ५८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ९२४ झाली आहे. आतापर्यंत एकूण १२३६ जणांचा मृत्यू झाल्याने १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा हद्दीतील २४ रुग्ण
हर्सूल सावंगी १, देवळाई रोड १, नारळीबाग १, एन-२ सिडको २, हनुमान नगर १, समर्थ नगर २, मिटमिटा ३, बीड बायपास २, निराला बाजार २, अन्य १०
ग्रामीण भागात अन्य ८ रुग्ण बाधित आढळून आले.