शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात वाळू माफियांवर कारवाई

By admin | Updated: May 6, 2014 11:03 IST

४३ लाख रुपयांची १४४० ब्रास वाळू जप्त

४३ लाख रुपयांची १४४० ब्रास वाळू जप्तवैजापूर : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणार्‍या वाळू माफियांविरुद्ध सोमवारी महसूल अधिकार्‍यांनी धडाकेबाज कारवाई केली. महसूल विभागाने तालुक्यात १५ ठिकाणी छापे टाकून ४३ लाख रुपये किमतीची १४४० ब्रास अवैध वाळू जप्त केली असून, १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यातील गोदापात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली या तस्करीकडे दुर्लक्ष केले. अवजड वाहनांमधून होणार्‍या वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील गंगथडी भागातील रस्ते अक्षरश: मरणपंथाला लागले आहेत. याबाबत गंगथडी भागातील ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या; परंतु अधिकार्‍यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. स्थानिक अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांना या बाबीची दखल घ्यावी लागली.सुटी असूनही रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी गंगथडी भागात जाऊन पाहणी केली असता त्यांना गोदानदीच्या काठावर अनेक अवैध वाळू साठे आढळून आले. त्यामुळे लवांडे यांनी स्थानिक संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे, खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने सोमवारी तालुक्यातील पुरणगाव येथील मधुकर ठोंबरे, रामा ठोंबरे, सूरज ठोंबरे, मिथुन ठोंबरे, लाखगंगा येथील रमेश सोनवणे, प्रवीण तुरकणे, प्रभाकर पडवळ, बाभूळगावगंगा येथील सोपान तुरकणे, सुभाष तुरकणे, विठ्ठल तुरकणे, वाल्मीक तुरकणे, राजू बोराडे, जालिंदर कुंजीर व बाबासाहेब कुंजीर या १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.