शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१७५ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: December 16, 2015 23:31 IST

ंगंगाखेड : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरुद्ध १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.

ंगंगाखेड : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरुद्ध १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १७५ वाहनाधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. गंगाखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी गंगाखेड पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी साडेचार ते साडेसातच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. शहरातील परळी नाका, डॉ. आंबेडकर चौक, दिलकश चौक, भगवती चौक, बसस्थानक आदी परिसरात पोलिस अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके स्थापण्यात आली होती. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये १७५ वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, गंगाखेड शहरातील मुख्य चौकात पोलिसांच्या पथकाकडून सुरू असलेल्या कारवाईची चर्चा शहरात पसरली होती. यामुळे अनेक वाहनधारकांनी पर्यायी रस्ते शोधून दंड वाचविण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप कांबळे, पंडीत रेजीतवाड, फौजदार भास्कर नवले, रवी मुंडे, राहूल बद्दूर यांचे पथक निर्माण करण्यात आले होते. तसेच या कारवाईत वाहतूक शाखेचे नवनाथ मुंडे, राजेश चक्कर पाटील, रामराव जाधव, माणिक वाघ, किर्तेश्वर तेलंगे, वसंत निळे, गणेश वाघ, सोमवंशी, राजेश्वर पाटील, करवर यांचाही सहभाग होता. ३० पोलिस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. मोहिमेतून २० हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वाहनधारकांकडूून वसूल केला. (प्रतिनिधी)