शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यात ८५ बोअर अधिग्रहित

By admin | Updated: June 15, 2014 00:55 IST

मधुकर सिरसट , केज मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात पाणीप्रश्न कमी भासला आहे.

मधुकर सिरसट ,  केजमागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात पाणीप्रश्न कमी भासला आहे. केज तालुक्यातील ३६ गावच्या पाणीटंचाईसाठी ८५ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून सहा गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ३८ गावांसाठी ८५ बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेल्या गावांत सुकळी, भोपला, वरपगाव, कापरेवाडी, सादोळा, मोटेगाव, तरनळी, उमरी, पाथरा, सेलगाव, गांजी, समदना, आरणगाव, शिरूरघाट, बोबडेवाडी, सोनीजवळा, साबला, कोठी, चिंचोली माळी, डोका कासारी, लाखा, हादगाव, शिरपुरा, काशिदवाडी, तांबवा, नायगाव, दैठणा, नाव्होली, ढाकेफळ, औरंगपूर, मांगवडगाव, सातेफळ, कवेड, वाघेबाभूळगाव, धर्माळा आदी गावांचा समावेश आहे.पाच बोअरच्या अधिग्रहण मंजुरीसाठी तहसीलदार केज यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. पाच बोअरच्या अधिग्रहणासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये दरडवाडी, धनेगाव, बनकरंजा, विडा, देवगाव टाकळी, जातेगाव, सोनेसांगवी या आठ गावांचा समावेश आहे. इनामदार यांनी घेतले ११ बोअरभाजपाचे प्रदेश सचिव तथा केज पंचायतीचे विरोधी गटनेते हारूण इनामदार यांनी त्यांचे वडील हाजी चांदपाशा इनामदार यांच्या स्मरणार्थ केज शहरात कोकीस पीर, गणेशनगर, फुलेनगर, दर्ग्या शेजारची वस्ती, खुरेशी मोहल्ला, दर्गारोड, अलाउद्दीन नगर, कळंबरोड, दर्गा मसजिद समोर, इनामदार वस्ती आणि धानोरा खुर्द येथे एक अशा बोअरचे खोदकाम आणि त्यावर स्वखर्चाने कृषीपंप टाकल्यामुळे पाणीटंचाईची समस्या कमी करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला. एक महिन्यापासून एका टँकरद्वारे दररोज सहा ते सात टँकर पाणी केजच्या विविध भागात मागणीप्रमाणे त्यांच्या वतीने पुरविण्यात येत होते. ज्या भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या, अशा भागात इनामदार यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या पाणीटंचाईच्या झळा कमी केल्या. नागरिकांच्या मागणीनुसार टँकरची संख्याही वाढविण्यात आली असल्याचे इनामदार यांनी सांगितले. अख्खा उन्हाळा पाणीटंचाईतचकेजकरांनी जानेवारी ते मे या पाच महिन्यात केजकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. शहरातील नागरिकांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली होती. प्रशासनाकडून वेळोवेळी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येते होते. मात्र त्यांना केजकरांचा पाणीप्रश्न कायमचा निकाली लावण्यात अपयश आले. या गावांसाठी दिले पाण्याचे टँकरकेज तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई भासत असलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये एकुरका -१, युसुफवडगाव २, दहिफळ वडमावली २. कोळगाव घाट १, सावळेश्वर १, लाडेगाव १ या सहा गावांना १ शासकीय आणि ७ खाजगी अशा ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीटंचाई विभाग प्रमुख अशोक वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पाच गावातील टँकरच्या मागणीचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आला आहे. तर तहसीलदार यांच्याकडे स्थळ पाहणी अहवालसाठी पाच गावांची यादी सादर करण्यात आली आहे.