शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

पकडायला गेले आरोपी, सापडला मुद्देमाल

By admin | Updated: May 11, 2014 00:39 IST

नांदेड :शहरातील शिवाजीनगर भागात रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधासाठी छापा मारणार्‍या पोलिसांच्या हाती तब्बल ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लागला़.

नांदेड :शहरातील शिवाजीनगर भागात रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधासाठी छापा मारणार्‍या पोलिसांच्या हाती तब्बल ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लागला़ त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला़ पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती़ त्यानुसार, त्यांनी सपोनि एम़एऩमजगर व पोउपनि शेळके यांना शिवाजीनगर भागातील एका घरात रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती दिली़ त्यानंतर पोलिसांनी एका घरावर छापा मारला़ ही कारवाई ६ एप्रिल रोजी करण्यात आली़ परंतु या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळाले नाहीत़ पोलिसांनी घराची झडती घेतली असता मात्र, १ लाख ४८ हजार १६५ रुपये रोख, २१ मोबाईल हँन्डसेट, मनगटी घड्याळ ५,दुचाकी २, अ‍ॅपे १, पिवळ्या धातूचे दागिने असा एकूण ३ लाख ३० हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल आढळला़ पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करुन हा मुद्देमाल जप्त केला होता़ तसेच मुद्देमालाची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी संबंधितांना वेळ दिला होता़ परंतु संबंधितांनी मालकी हक्काचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत़ त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे़ परंतु मुद्देमाल नेमका कोणाचा? तो चोरीतील आहे का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहेत़ (प्रतिनिधी)