शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादावरून खून करणाऱ्या आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

औरंगाबाद : पैशाच्या वादातून सोमीनाथ मांगीलाल राठोड यांचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा भावांपैकी राजू मोतीलाल राठोड ...

औरंगाबाद : पैशाच्या वादातून सोमीनाथ मांगीलाल राठोड यांचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा भावांपैकी राजू मोतीलाल राठोड (३१), विजय मोतीलाल राठोड (३५) या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तर संजय मोतीलाल राठोड (३८, सर्व रा. मारसावळी तांडा, ता. फुलंब्री) याला मारहाण केल्याप्रकरणी एक वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी बुधवारी ठोठाविली.

प्रकरणात मयत सोमीनाथ राठोड यांची पत्नी वैशाली राठोड (३८, रा. मारसावळी तांडा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, सोमीनाथ राठोड यांनी गावातील राजू राठोड याला दहा ते बारा हजार आणि विजय राठोड याला पंधरा हजार रुपये उसनवारी दिले होते. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना तेथे आरोपी राजू आणि विजय राठोड असे दोघे आले. त्यांनी सोमीनाथ यांना आवाज देऊन घराबाहेर बोलावले. त्यावेळी फिर्यादी भांडी घासत होत्या. सोमीनाथ हे घराबाहेर आले असता आरोपी राजूने त्यांच्या पोटावर चाकूने वार केला तर विजयने त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. पतीला सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये आल्या असता राजूने त्यांच्यावर देखील चाकूने वार करुन जखमी केले. मारहाण सुरु असतांना आरोपीचे भाऊ संजय राठोड हा तेथे आला व त्याने देखील फिर्यादीला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या सोमीनाथ राठोड यांना जीपमधून घाटीत आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.