शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीसाठी ९५ टक्के मतदान

By admin | Updated: May 6, 2015 00:31 IST

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले.

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले. सकाळी ८ ते सांयकाळी ५ या वेळेत ९४.४५ टक्के मतदान झाले. १३१६ पैकी १२४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोणत्याही ठिकाणी गोंधळ झाला नसून शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या १९ जागा होत्या. त्या पैकी पाच जागा बिनविरोध निघाल्याने मंगळवारी १४ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बीड शहरातील तालुका निबंधक कार्यालय, वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उर्वरीत तालुक्यातील तालुका सहनिबंधक कार्यालयात मतदान प्रक्रीया पार पडली. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. त्यानंतर काही पुढील एक तास मतदान प्रक्रीया मंदावली होती मात्र पुन्हा मतदार मतदानासाठी बाहेर पडले. पाच वाजेपर्यंत ९४.४५ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी डीसीसी संचालक मंडळासाठी मतदान पार पडले. १४ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. ७ मे रोजी बीड शहरातील जिल्हा मजूर सहकारी संघाच्या कार्यालयात सकाळी ८ वाजल्यापासून मतदान मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे. या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यांनी केले मतदानआ. अमरसिंह पंडित व जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराई येथे मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक केंद्र अध्यक्ष म्हणून बी.डी. फलके यांनी काम पाहिले. परळी येथे खा. प्रीतम मुंडे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे, अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनी आपला हक्क बजावला. माजलगाव येथे माजी आ. प्रकाश सोळंके यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सदरील निवडणूक सेवा सोसायटी, महिला, अ.जा.ज., वि.जा. भ.ज., इमाव, कृषीपणन, नागरी बँक यांच्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर व्हीडीओ कॅमेऱ्याद्वारे शुटींग करण्यात आली आहे. बोगस प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली होती. तसेच झोनल आॅफिसर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोठेही गोंधळ झाला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. (प्रतिनिधी)