शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

By admin | Updated: June 10, 2014 00:16 IST

नांदेड : जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावर सध्या ९३ हजार १७६ मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़

नांदेड : जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावर सध्या ९३ हजार १७६ मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात चालू खरीप हंगामात २५ हजार हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे प्रक्रिया करुन वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.कृषी केंद्रावर ९३ हजार १७६ मेट्रिक टन खत उपलब्ध असून यात युरिया ३६ हजार ९९ मे.टन, डीएपी ९ हजार ३६ मे.टन, एमओपी ६ हजार ४३६ मे.टन, संयुक्त खते १६ हजार ६०५ मे.टन, एस.एस.पी. ११ हजार मे.टन याप्रमाणे खताचा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार यांनी सांगितले. सोयाबीन हे परागसिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी पेरणी करण्यासाठी बियाणाची बॅग घेण्याची गरज नसते. एकवेळ बॅग घेतल्यावर त्यापासून होणारे उत्पन्न झालेले सोयाबीन पुढील तीन वर्षापर्यंत बियाणे म्हणून वापरता येते. यासाठी बियाणाची उगवण शक्ती तपासणी करणे व बीजप्रक्रिया करुन वापर करणे आवश्यक असते. खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतर पेरणी करावी. म्हणजे दोन ते तीन दिवसांत शंभर मि. मी. किंवा चार इंच पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे योग्य राहिल. गतवर्षी ७ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. यात कापूस २ लाख ७७ हजार हेक्टर, सोयाबन २ लाख ७५ हजार हेक्टर, तृणधान्य ९० हजार, कडधान्य १ लाख १६ हजार तर १५ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली होती. चालू वर्षातील खरीप हंगामात सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात २५ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात पेरणीसाठी लागणारे बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. सोयाबीनसाठी महाबीज, खाजगी कंपनी, गोदामातील शिल्लक व शेतकऱ्यांकडे असणारे बियाणे असे शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेवर व रास्त दरात मिळावेत, यासाठी १७ भरारी पथकाची स्थापना केली असून तक्रार निवारण कक्ष, बियाणे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)