कबाडगल्लीत जुगार खेळताना ८ जण ताब्यात

By Admin | Updated: August 9, 2015 00:30 IST2015-08-08T23:49:56+5:302015-08-09T00:30:24+5:30

बीड : येथील कबाडगल्लीमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांच्या पथकाने शनिवारी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

8 people to play gambling in Kabadgalli | कबाडगल्लीत जुगार खेळताना ८ जण ताब्यात

कबाडगल्लीत जुगार खेळताना ८ जण ताब्यात


बीड : येथील कबाडगल्लीमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांच्या पथकाने शनिवारी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संतोष शिवाजी शेटे, पिंटू लक्ष्मण कुरळे, अभिजीत अशोक भटकर, अनिल चंद्रकांत पवार, राहुल अभिमान थोरात, विनोद लक्ष्मण मुळे, योगेश अर्जून साळुंके, श्रीधर राजेंद्र ठोंबरे अशी आरोपींची नावे आहेत. बीड शहरातील कबाडगल्ली भागात झन्नामन्ना नावाचा जुगार चालत असल्याची माहिती डीवायएसपी गावडे पाटील यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी कबाडगल्ली परिसरातील एका बिल्डींगमध्ये शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. तेथून या आठ लोकांसह तीन दुचाकी, सहा मोबाईल, २० हजार ९०० रूपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई डीवायएसपी गावडे पाटील यांचे पथक प्रमुख पो. काँ. मुरली गंगावणे, सचिन आगलावे, नितीन काकडे, ईश्वर गंगावणे, नारायण सरवदे, सादेक तडवी, बाळकृष्ण म्हेत्रे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 8 people to play gambling in Kabadgalli