७ निलंबित,१ बडतर्फ तिघांविरुद्ध शिस्तभंग

By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:22:22+5:302014-11-29T00:31:44+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांवर आज स्थायी समितीच्या आदेशाने कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी घेतला.

7 suspended, 1 disciplined against the three | ७ निलंबित,१ बडतर्फ तिघांविरुद्ध शिस्तभंग

७ निलंबित,१ बडतर्फ तिघांविरुद्ध शिस्तभंग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांवर आज स्थायी समितीच्या आदेशाने कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी घेतला. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ७ आरोग्यसेवक निलंबित करण्यात आले आहेत, तर एक कंत्राटी आरोग्यसेविका बडतर्फ करण्यात आली आहे.
साथरोगांमुळे नागरिक धास्तावले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वेळेत येत नाहीत. वेळोवेळी दिलेल्या आदेश, सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य रामदास पालोदकर, दीपक राजपूत यांनी केला. यावरून जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. बैठकीत पाणीटंचाई व दुष्काळ उपाययोजनांवर चर्चा झाली.
कुणावर केली कारवाई ?
सिद्धनाथ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एस.एस. घुले, ए.एस. खाजवणे, एस.एस. तामडे, आर.बी. देहाडे, प्रमोद देवरे, लाडगाव येथील व्ही.ए. भागवत, एम.टी. निकाळजे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पालोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मध्यमसिंग मेहेर, डॉ. रवींद्र दारुंटे, वैजापूर तालुका आरोग्य अधिकारी हरबडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, तर सिद्धनाथ वडगाव येथील बिलेवाल यांची बनौटी येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तेथील कंत्राटी आरोग्यसेविकेला बडतर्फ करण्याचा निर्णय बैठकीत झाला. कामात हलगर्जी करण्यामुळेच या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: 7 suspended, 1 disciplined against the three