शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ६० कि. मी. नाले स्वच्छ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:04 IST

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. ६० कि. मी. नाल्यांची लांबी असून, दरवर्षीप्रमाणे थातूरमातूर सफाई करू नका, छोट्या जेसीबीचा वापर करावा, असेही आदेशित करण्यात आले.

ठळक मुद्देआढावा बैठक : छोट्या जेसीबीचा वापर करावा

औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. ६० कि. मी. नाल्यांची लांबी असून, दरवर्षीप्रमाणे थातूरमातूर सफाई करू नका, छोट्या जेसीबीचा वापर करावा, असेही आदेशित करण्यात आले.महापौरांनी आज सकाळी नालेसफाईसंदर्भात सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. शहरात एकूण ७२ नाले आहेत. मोठ्या नाल्यांची संख्या १८ आहे. सर्व नाल्यांची लांबी ६० कि. मी. आहे. नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. पावसाच्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे. नागरिक १२ महिने नाल्यांमध्ये कचरा आणून टाकतात. औषधी भवन, जयभवानीनगर, बारुदगरनाला, बायजीपुरा, संजयनगर, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, औरंगपुरा, उल्कानगरी, कोकणवाडी आदी भागांत नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. आज सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केले. आपत्कालीन सेवेचा हा एक भाग असल्याचे सांगितल्यावर अधिकाºयांनी नमते घेतले. नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जेसीबी, पोकलेन, टिप्पर या वाहनांची तात्काळ अल्पमुदतीची निविदा काढण्याची सूचना केली. सोबतच मनुष्यबळ उभे करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला ३ लाख रुपये देण्याचे सूचित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाल्यांची कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले. शहरात ११ ठिकाणी नाल्यांवर इमारती बांधल्या आहेत. मागील वर्षी औषधी भवनने नाल्याच्या स्वच्छतेचा खर्च पालिकेला दिला होता. शिवाई ट्रस्टने स्वत: नाल्याची स्वच्छता करून घेतली होती. उर्वरित इमारतधारकांकडून अगोदर स्वच्छतेची रक्कम वसूल करावी, असेही आदेश त्यांनी दिले.प्रभागनिहाय नालेप्रभाग-१ १४प्रभाग-२ ०५प्रभाग-३ १०प्रभाग-४ ११प्रभाग-५ १५प्रभाग-६ १२प्रभाग-७ ११प्रभाग-८ १०प्रभाग-९ १०

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाriverनदी