६ वर्षांत स्वाईन फ्लूने ५८ रुग्णांचा मृत्यू

By Admin | Updated: January 23, 2015 00:57 IST2015-01-23T00:47:08+5:302015-01-23T00:57:43+5:30

औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने

58 cases of swine flu death in 6 years | ६ वर्षांत स्वाईन फ्लूने ५८ रुग्णांचा मृत्यू

६ वर्षांत स्वाईन फ्लूने ५८ रुग्णांचा मृत्यू


औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. २००९ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत १६५ रुग्णांपैकी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते. ९५ टक्के रुग्ण बरे होत असल्याने स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला असा त्रास होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक निर्माण होते. थंड वातावरण स्वाईन फ्लू होण्यास हातभार लावत असल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असतानाही वेळेवर उपचार मिळाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते. ४ ते ५ दिवसांच्या कालावधीतील उपचारात रुग्ण ठणठणीत बरे होतात. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावावे लागते. अशा वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यशही येते.४
स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसून वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. स्वाईन फ्लूचे ९५ टक्के रुग्ण बरे होतात. सर्दी, खोकला, धाप लागणे, अशी लक्षणे असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. स्वत:ला किंवा आजूबाजूंच्या लोकांना खोकला येत असेल, तर अशा वेळी तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी केले.

Web Title: 58 cases of swine flu death in 6 years