शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

४५ नगरसेवक असूनही भाजपाला मताधिक्य

By admin | Updated: May 20, 2014 01:10 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीड विधानसभा मतदार संघात विशेषत: बीड शहरातून राष्ट्रवादीला सर्वाधिक मताधिक्य देऊ,

व्यंकटेश वैष्णव, बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीड विधानसभा मतदार संघात विशेषत: बीड शहरातून राष्ट्रवादीला सर्वाधिक मताधिक्य देऊ, अशी वल्गना करणार्‍या नेत्यांचा निकालानंतर फुगा फुटला आणि भाजपाला बीड शहरातून २ हजार ११४ मताधिक्य मिळाले़ बीड लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कारण भाजपाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे व एकेकाळी त्यांचेच शिष्य असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस हे एकमेकांच्या विरोधात उभे होते़ बीड मतदार संघात राष्ट्रवादीच्या तंबूत अकरा आमदारांची फौज होती तर भाजपाकडून एकच आमदार म्हणजेच पंकजा पालवे या खा़ मुंडेसाठी प्रचारात उतरल्या होत्या़ बीड विधानसभा मतदार संघात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती़ मोदी लाटेपुढे कोणाचाच टिकाव लागला नाही़ बीड शहरात सुरूवातीपासूनच पालकमंत्री क्षीरसागर यांनी विशेष लक्ष दिले होते़ शहरातील बहुतांश भागात प्रचार सभा घेतल्या होत्या़ याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बीड नगर परिषदेत ४६ पैकी ४५ नगर सेवक राष्ट्रवादीचे म्हणजेच पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आहेत़ असे असताना देखील एकट्या बीड शहरातून भाजपाला २८ हजार ६९० एवढे मतदान झाले तर सुरेश धस यांना २६ हजार ५७६ एवढी मते पडली़ जिल्ह्यातील राकॉच्या आमदारांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपापल्या विधानसभा मतदार संघातून मताधिक्य देण्याची ताकीद पक्ष प्रमुखांनी दिली होती़ मात्र जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने राहिल्याने राकॉचे मनसुबे धुळीला मिळाले आणि भाजपाला चांगले यश मिळाले़ मोदी लाट रोखली बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी बीड विधानसभा मतदार संघात भाजपाला केवळ ३८५५ एवढेच मताधिक्य मिळाले आहे. मोदी लाट असताना देखील पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे इतर विधानसभा मतदार संघाप्रमाणे भाजपाला बीड विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले नाही हे तितके च खरे.