शहरात तापाचे ४२९, तर ग्रामीण भागात १० रुग्ण
By Admin | Updated: August 15, 2014 01:12 IST2014-08-15T01:04:03+5:302014-08-15T01:12:35+5:30
औरंगाबाद : शहरात ४१९ तर ग्रामीण भागातून १० तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील १७ रुग्ण डेंग्यूसदृश आहेत. २ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शहरात तापाचे ४२९, तर ग्रामीण भागात १० रुग्ण
औरंगाबाद : शहरात ४१९ तर ग्रामीण भागातून १० तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील १७ रुग्ण डेंग्यूसदृश आहेत. २ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. ११ ते १३ आॅगस्टपर्यंत १ लाख ३८ हजार ३०६ घरांमध्ये अॅबेट ट्रीटमेंट करण्यात आली आहे. २ लाख ४५ हजार ७२४ पाण्याचे साठे तपासले. ८०० ठिकाणी पाणीसाठे रिकामे केले. ४१९ तापाचे रुग्ण आढळले. सर्दी, खोकल्याचे रुग्णही आढळून येत आहेत, असे डॉ. टाकळीकर यांनी सांगितले.
घाटीत १ आॅगस्टपासून आजपर्यंत १० रुग्ण दाखल झाले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात डासांपासून होणाऱ्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात नसल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.
घरांमध्ये डास पाळू नका
नागरिक घरांमध्ये डास पाळत आहेत. डासांचा उपद्रव डेंग्यूसदृश आजार पसरविण्यास कारणीभूत ठरत आहे. मातीची भांडी, हौद, पाण्याच्या उघड्या टाक्यांमध्ये डेंग्यू डासांची अंडी होतात. स्वच्छ पाण्यामध्ये ती अंडी असतात. त्यामुळे डासांचा फैलाव होतो. घरातील सर्व वापराचे पाणी झाकून ठेवावे. त्यामुळे घरात डास पाळण्यासारखाच हा प्रकार असल्याचे मत डॉ. टाकळीकर यांनी व्यक्त केले.