शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४ टक्के पाणी नमुने दूषित

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते.

 औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते. गेल्या महिन्यात प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीमध्ये औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डांमधील ४ टक्के पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील कन्नड शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यातील २८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. छावणी परिसरातील निजाम बंगला येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत औरंगाबादसह जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, बोअरवेल आणि नळाच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी केली जाते. मानवाला सर्वाधिक आजार दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याचा धोका असतो. तसेच काही जलसाठ्यात रासायनिक अंश आढळतात. काही पाण्यात आयोडिनचे प्रमाण कमी आढळते. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने औरंगाबाद शहरासह वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पाचोड या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील पेयजल नमुन्याची तपासणी केली जाते. निजाम बंगला येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरासह सर्व तालुक्यांच्या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळाद्वारे दिल्या जाणार्‍या नमुन्यांची तपासणी केली जाते. याविषयी प्रभारी प्रादेशिक अधिकारी एस. व्ही. पत्की यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरातील पाणी काही भागात दूषित असल्याचे निदर्शनास आले. कन्नड नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पैकी ५ नमुने दूषित आढळले आहेत. खुलताबाद नगर परिषदेने ३० नमुन्यांची तपासणी केली. मात्र, हे सर्व नमुने उत्कृष्ट आढळले. पैठण नगर परिषदेच्या हद्दीत ११ पैकी १ पाण्याचा नमुना दूषित होता. तर वैजापूर नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पाणी नमुन्यांपैकी १ नमुना दूषित होता. याबाबतचा अहवाल नगर परिषद आणि संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना पाठविण्यात आला होता. औरंगाबाद मनपाची जलशुद्धीकरणाची प्रक्रिया उत्कृ ष्ट आहे. केवळ पाण्याच्या टाकीपासून ते नागरिकांच्या नळापर्यंत जाणार्‍या पाईपलाईनमध्ये गळती असेल तरच पाणी दूषित होते. २८ नमुने दूषित औरंगाबाद मनपाच्या विविध वॉर्ड ‘अ’ आणि वॉर्ड ‘ड’, वॉर्ड ‘ब’ आणि वॉर्ड ‘क’, वॉर्ड ‘ई’ आणि वॉर्ड ‘फ’ मधून प्रत्येकी पाच नमुने, असे ३० नमुने तपासणीसाठी येतात. गेल्या महिन्यात मनपाकडून ६५३ पाणी नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २८ नमुने दूषित आढळले.