शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

३६५ दिवस कार्यरत राहणारा शिक्षक

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

विठ्ठल भिसे, पाथरी येथील जिल्हा परिषदेच्या माळीवाडा शाळेत आदर्श घडविण्यात आला आहे़

विठ्ठल भिसे, पाथरीकाही माणसे ध्येयवेडे असतात. एका ध्येयाने झपाटले की ते साध्य करण्यासाठी वाट्टेल तेवढे परिश्रम घेतात आणि अशीच माणसे आदर्शही ठरतात़ येथील जिल्हा परिषदेच्या माळीवाडा शाळेतही असाच आदर्श घडविण्यात आला आहे़ जि़ प़ ची नोकरी करीत असताना शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित ३६५ दिवस शाळा भरवून माळीवाडा येथील जि़प़ शाळेचे मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी आदर्श निर्माण केला आहे़ शिक्षक दिनानिमित्त अशा शिक्षकांची निश्चित आठवण झाल्याशिवाय राहत नाही़ आजचे शिक्षण स्पर्धेचे झाले आहे़ खाजगी शाळा गतीने पुढे जात आहे़ परंतु, जि़ प़ च्या सरकारी शाळांमधील परिस्थिती सुधारण्यास अवधी लागणार आहे़ एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यास ही परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही हे ही तेवढेच खरे़ पाथरी शहरात माळीवाडा परिसरात जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे़ जि़ प़ ची शाळा म्हटलं की अनेक समस्या, पालकांची अनास्था असे चित्र डोळ्यासमोर येते़ परंतु, या शाळेत २००८ साली बजरंग गिल्डा, मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि शाळेचा कायापालटच झाला़ येथील शालेय व्यवस्था बदलण्याची जबाबदारी स्वीकारून पालकांच्या मदतीने गुणवत्ता विकास पॅटर्न त्यांनी राबविला़ शाळेचा नक्षा बदलविला़ १७० वरून विद्यार्थी संख्या ५६५ वर गेली़ शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी संगणक, साऊंड सिस्टीमसह उपलब्ध केले आणि ३६५ दिवस विना सुटी शाळा घेतली़ वर्षभरात १०० परीक्षा, आदर्श परिपाठ असे उपक्रम राबवित मागील तीन वर्षे जिल्हा पारितोषिक प्राप्त केले़ लोकवर्गणी जमा करून सर्व कामे तडीस नेणाऱ्या मुख्याध्यापक बजरंग गिल्डा या शिक्षकाच्या कर्तृत्वाला शालेय शिक्षण समितीचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे़ त्यामुळेच ही शाळा जिल्ह्यामध्ये आदर्श ठरली़ चांगले काम करण्याची तयारी आणि मनात जिद्द असल्याने शालेय शिक्षण समिती आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी माळीवाडा शाळेचा नावलौकिक वाढविला़ शैक्षणिक दर्जा कायम राखत केलेले हे कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे़