शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड तालुक्यात २९२ ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

किशोरसिंह चौहाण , मुखेड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या २०५ गाव, वाडी, तांड्यांतील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोत तपासणी करण्यात आली.

 किशोरसिंह चौहाण , मुखेड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या २०५ गाव, वाडी, तांड्यांतील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोत तपासणी करण्यात आली. शहरातील १७ वॉर्डातील १५१ पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १२ ठिकाणचे, ग्रामीण भागातील २९२ ठिकाणचे पाणी दूषित असल्याचे अनुजैविक पाणी तपासणीत पुढे आले आहे. मुखेड तालुक्यात पिण्याचे पाणी माणसाच्या आरोग्याचे शत्रू बनले आहे. दूषित पाणी सेवनाने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनस्तरावर ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असून अनेक योजना राबविण्यात येतात़ आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी राज्य व केंद्र शासन निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ग्रामपंचायतस्तरावर ही योजना केवळ कागदावरच राबविली जात आहे. आजही ग्रामणी भागात ८० ते ८५ टक्के लोकांच्या घरात शौचालय नाहीत. अनेक जण उघड्यावर शौचास बसतात़ त्यामुळे हेच पाणी विहीरीत, बोअरमध्ये मिसळून दूषित होत आहे. प्रत्येक महिन्याला पाणी गुणवत्ता व स्वच्छता सर्वेक्षण केले जाते व ज्या गावांतील पाणी दूषित आहे त्या गावांचे सरपंच, ग्रामसेवकांना तपासणीत दूषित आढळलेल्या पाणीस्त्रोताची माहिती देवून त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. पण याकडे लक्ष दिले जात नाही व सुधारणाही केली जात नाही. ग्रामीण भागात सार्वजनिक विहीर, बोअर, हातपंपाशेजारी पाण्याचे डबके साचल्याचे चित्र आहे. अनेक गावांतील महिला धुने धुतात व शेतकरी बैल धुतात. लहान मुले हातपंपांच्या शेजारी शौचास बसतात.यामुळे जमलेली घाण पाणी जमिनीत मुरत आहे. यामुळे पाणी दूषित होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तालुक्यात ८५ टक्के सार्वजनिक पाणीपुरवठा करणारा परिसर अस्वच्छ असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. पण ज्यांच्याकडे पाणीपुरवठा करणार्‍या ठिकाणावर स्वच्छता अबाधीत ठेवण्याची जबाबदारी आहे. तेच याकडे दुर्लक्ष करतात व प्रशासनाकडे बोट दाखवतात. ग्रामीण भागातील पाणी तपासणीत विलंब होऊ नये म्हणून राज्य शासनाने तालुकास्तरावर अनैजीवक पाणी तपासणीसाठी प्रयोग शाळा उभा केली आहे. या प्रयोग शाळेतून प्रत्येक महिन्यात पाणी तपासणी केली जाते़ परंतु अनेक गावचे सरपंच व ग्रामसेवक या प्रयोगशाळेकडे गावातील पाणीस्त्रोत तपासणीसाठी फिरकतच नसल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसून येते. तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून बाºहाळी प्रा. आरोग्य केंद्रातंर्गत ३१ ग्रामपंचायतीसह ७५ वाडी, तांडे आहेत. येथील १०७ पाणीस्त्रोत मध्यम, ३८ सोम्य आहे. चांडोळा पीसी अंतर्गत १० ग्रामपंचायतींसह १३ वाडी, तांडे असून येथील पाणीस्त्रोत २१ तीव्र, १६ मध्यम, ८ सौम्य. सावरगाव प्रा. आ. केंद्रातंर्गत २२ ग्रामपंचायतीसह २५ वाडी, तांड्यांचा समावेश असून २ तीव्र, ७७ मध्यम, १० सौम्य आहे. राजूरा २४ ग्रा. पं. सह ३५ वाडी , तांडे, ६० मध्यम, ५९ सौम्य आहे. जांबय पाच ग्रापं. अंतर्गत ८ वाडी, तांडे, २ तीव्र, २४ मध्यम, ६ सौम्य. सावरमाळ २० ग्रामपंचायत अंर्गत ३० वाडी, तांडे, २७ मध्यम, ७९ सौम्य. बेटमोगरा (पीसी) १५ ग्रामपंचातअंर्गत १९ वाडी, तांडे, २ तीव्र, ५२ मध्यम २९ सौम्य जोखीम पाणीस्त्रोत आढळून आले आहेत. यात बेळी बु, जाहूरतांडा, जाहूर, मेथी, तूपदाळ, उंद्री (पदे), एकलारा, पिंपळकुंठा, पिंपळकुंठातांडा, बिल्लाळी, कबनूर, हसनाळ, कोळनूर, कुंद्राळा, थोरवाडी, पैसमाळ,सलगरा खुर्द, खंडगाव, होकर्णा, चांडोळा, चांडोळातांडा, भगनूरवाडी, तांदळी, जांब खुर्द, पांखडेवाडी, बेळी खुर्द, आडमाळवाडी, खैरका, बोमनाळी, शिकारा, पांडुर्णी, कोडग्याळ, मोहणातांडा, शिरुर (दबडे), आखरगा, बावनवाडी, जुन्ना, अंबुलगा, दापका (गुं) आदी गावचे पाणी दूषित आहे. शहरातील वडर गल्ली, वाल्मीकनगर, गायत्री गल्ली, शिवाजीनगर, विद्यानगर, टिळकनगर, कोळी गल्ली, लोखंडे चौक, विरभद्र गल्ली परिसरातील हातपंप, विद्युतपंपाचे पाणी दूषित आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीकडे टीसीएल पावडर उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे़ तालुक्यात १२७ गामपंचायतींअंतर्गत १५० वाडी, तांड्यांसह ६७८ हातपंप आहेत, ११० नळयोजना आहेत तर ६८ विहीर व ४४१ विद्युतंप आहेत. प्राथमिक आरोग्य विभाग व अनुजैविक पाणी तपासणी प्रयोग शाळेने तपासलेल्या वरील पाणीस्त्रोतामध्ये २९२ ठिकाणचे पाणी दूषित असून पिण्याच्या अयोग्य असल्याचा प्रकार समोर आला आहे.