शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २५ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २५ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाचे सुभाष लोमटे, बसपाचे इंद्रकुमार जेवरीकर आणि समाजवादी पार्टीचे अ‍ॅड. सदाशिव गायके यांचाही समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवारांनी मतदारांचा कौल मागितला होता. मुख्य आणि थेट लढत मात्र, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यातच झाली. मतदारसंघात ९ लाख ८२ हजार मतदारांनी मतदान (६२ टक्के) केले. उमेदवाराने वैध मतांच्या १२.५ टक्क्यांपेक्षा कमी मते घेतल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. त्यानुसार औरंगाबाद मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी मतांचा हा कोटा १ लाख १० हजार इतका ठरला. चंद्रकांत खैरे आणि नितीन पाटील हेच केवळ लाखाच्या वर मते घेऊ शकले. त्यामुळे इतर २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी, आंबेडकर नॅशनल काँग्रेस, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, गरीब आदमी पार्टी, वेल्फेअर पार्टी यांच्या उमेदवारांबरोबरच १७ अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मागितला होता. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांना ११,९६५ तर बसपाचे उमेदवार जेवरीकर यांना ३७,३८७ मते मिळाली. उर्वरित उमेदवारांना १० हजारांचाही पल्ला गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर २५ हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर साडेबारा हजार रुपये एवढी अनामत रक्कम ठेवली होती. २००९ मध्ये १९ जण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ पैकी १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा एकूण ७ लाख १२ हजार मतदान झाले होते. डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ९० हजार मते मिळविणे आवश्यक होते. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उत्तमसिंह पवार आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज वगळता इतरांना तेवढी मते मिळविता आली नव्हती. खैरे यांना २ लाख ५५ हजार, पवार यांना २ लाख २२ हजार आणि शांतीगिरीजी महाराजांना १ लाख ४८ हजार मते मिळाली होती.