शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणात उरले २३ उमेदवार

By admin | Updated: June 7, 2014 00:31 IST

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण १३ जणांनी माघार घेतली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण १३ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता २३ उमेदवार उरले आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असली तरी काँग्रेस आघाडीचे सतीश चव्हाण आणि युतीचे शिरीष बोराळकर या दोघांमध्येच सरळ लढत होण्याची शक्यता आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत यापैकी ६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर ३६ अर्ज उरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत यातील १३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपली. या मुदतीनंतर एकूण २३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे शिरीष बोराळकर, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अल्ताफ अहमद एकबाल अहमद, आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुसलिमीनचे मुशताख अहमद खान दाऊद खान तसेच अपक्ष म्हणून प्रा. शंकर अंभोरे, विलास जाधव, रामराव दाभाडे, नानासाहेब दांडगे, पांडुरंग नरवडे, गणेश बजगुडे, उद्धव बनसोडे, जगजीवनराव भेदे, काकासाहेब मोरे, डॉ. यशवंत होवाळ, रुपेश राजेमाने, रतन वाघ, वाजीद अन्वर अब्दुल रशीद, सय्यद शमीम रजवी, डॉ. शंकर सुरवसे, सखाराम खुरपे, सय्यद सामेयुद्दीन, संतोष लोखंडे यांचा समावेश आहे. विभागात १० हजार मतदार वाढलेनिवडणूक जाहीर झाल्यानंतरही आयोगाने विभागात ३ जूनपर्यंत पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेमुळे विभागात १० हजार ७२४ मतदारांची भर पडली आहे. विभागात याआधी ३ लाख ६८ हजार ३७५ मतदार होते. आता ही संख्या ३ लाख ७९ हजार १०९ झाली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ८६६ मतदार वाढले आहेत. जालना जिल्ह्यात ४०५, बीड जिल्ह्यात २२१६, परभणी जिल्ह्यात ४१६, हिंगोली जिल्ह्यात १६८, नांदेड जिल्ह्यात १४९४, उस्मानाबाद जिल्ह्यात ७९३ आणि लातूर जिल्ह्यात ४५६ मतदारांची भर पडली आहे.