शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रव्हल्स अपघातात २२ जखमी

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

लोहा : लोहा येथून नांदेडला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स झाडावर धडकल्याने २२ प्रवासी गंभीर जखमी झाले़ शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारेगावजवळ हा अपघात घडला़

लोहा : लोहा येथून नांदेडला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स झाडावर धडकल्याने २२ प्रवासी गंभीर जखमी झाले़ शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारेगावजवळ हा अपघात घडला़ शुभम ट्रॅव्हल्स क्रमांक एम़एच़२६-बी़२४९ ही लोह्यावरुन नांदेडकडे निघाली़ कारेगावजवळ ट्रॅव्हल्सचालक धोंडिबा वडजे याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ती झाडावर आदळली़ अपघातात राजू गंगाधर सूर्यवंशी (वय ३४, रा़ बोरी), विठ्ठल घन:श्याम पवार (६०, रा़ हळदव), राधा किशन टोणगे (३५, दापशेड), अंकिता टोणगे (११, दापशेड), व्यंकट तुळशीराम आलट (५०, हरसद), गोविंद रामचंद्र जाकापुरे (२४, लोहा), भीमराव सोपान तिगोटे (३५, रिसनगाव), प्रकाश मारूती (५०, सोनखेड), पंढरी गोडबोले (५५, दगडगाव), वैजनाथ माधव विश्वास (५५, बामणी), कोंडिबा गणपती श्रीमंगले (४५), रुक्मीनी ठाणेकर (६५), आंबादास पवार (४०), लोह्णाचे पोलिस श्यामसिंग, रामसिंग ठाकूर (४०), कौशल्याबाई ठाणेकर (६०), शेख अलीमशेख उस्मान (२०), रेश्मा फेरोज (२५), शेख फारूख (५०), सोनी पाचमवाड (५), बालाजी पवार (५०), धोंडीबा वडजे (४५, चालक), लक्ष्मीबाई माचेनवाड (५०) हे जखमी झाले़ यातील चार जण अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे़ इतर जखमींवर लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची घटना कळताच कारेगावचे ग्रामस्थ तसेच प्रकाश चव्हाण, गणेश मोरे, मुंडकर यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यास मदत केली़ (वार्ताहर) पथदिवे बंद नांदेड - शहरातील मयुरविहार कॉलनीतील पथदिवे गत अनेक दिवसांपासून बंद आहेत़ पावडेवाडी नाका ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत सर्वत्र अंधार पसरत आहे़ रात्रीच्यावेळी तास-दोन तास पथदिवे सुरु असतात़ अन्यथा सर्वत्र काळोख पसरलेला असतो़