शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारीसाठी २१६ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीन वर्षांत भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत दिली. शहरातील भूमिगत गटारीच्या कामाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून होता; परंतु शहरातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्यावे लागले. बीड पालिकेने केंद्राच्या शहरी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर स्वत: नगरविकासमंत्री कमलनाथ यांना बोलले. त्यानंतर बीड पालिकेसाठी भरीव निधीची तरतूद झाली, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. पालिका , राज्य सरकार दहा टक्के खर्च करणार आहे तर केंद्र सरकार ८० टक्के निधी अनुदान स्वरुपात देणार आहे. राज्यातील सहा पालिकांना हा निधी मिळाला असून त्यात बीडचा समावेश आहे. जायकवाडीतील पाणी उपलब्ध केल्याने भूमिगत गटारीच्या कामास मंजुरी मिळू शकली. हे काम दर्जेदार करण्यात येणार असून गटारीचे पाणी शेतीसाठी वापरात आणण्यात येणार आहे. शिवाय इतर कामांसाठीही त्याचा पुर्नवापर करता येऊ शकतो का? हे देखील पाहिले जाणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. भूमिगत गटारीमुळे मलेरिया व साथरोग प्रतिबंधक कार्यक्रमावर होणारा खर्च वाचणार आहे. शिवाय सफाई कामगारही कमी लागतील. शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने भूमिगत गटारी अतिशय महत्त्वाच्या होत्या. हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले. हद्दवाडीपासून सुरुवात भूमिगत गटारीच्या कामांना हद्दवाढीच्या भागांपासून होईल. एकूण २१६ किमी अंतरापर्यंत भूमिगत गटार तयार केले जाणार आहे. शहरातील नाल्या, रस्ते यामुळे या कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हद्दवाढीच्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गटारीचे पाणी साठविण्यासाठी शहराबाहेर कॅनॉल उभारण्यात येणार आहेत. चार झोनमध्ये काम भूमिगत गटारीचे काम चार झोनमध्ये होणार आहे. एबीसीडी अशी नावे देऊन शहरातील चारही बाजूने काम करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी) भाजीमंडईचे काम प्रगतीपथावर शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना मिळाला पाहिजे, यासाठी वातानुकुलित भाजीमंडई सिद्धीविनायक कॉम्पलेक्स परिसरात उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.