शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

२१.५ लाख पुस्तके मिळणार मोफत

By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST

लातूर : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत.

लातूर : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. त्यामुळे १०० टक्के विद्यार्थ्यांच्या हातात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके पडतील़ जिल्हा परिषदेने लातूर जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ४६ हजार २२९ पाठ्यपुस्तकांची भांडार विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारपर्यंत २० लाख ९४ हजार ७६७ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. याची टक्केवारी ९८ टक्के असली तरी सोमवारपर्यंत उर्वरित २ टक्के पुस्तकेही वाटप केले जातील, असे भांडार व्यवस्थापक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील शाळांसाठी ७ लाख ९६ हजार ४३६ स्वाध्याय पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. पैकी ६ लाख ८२ हजार ४१८ स्वाध्याय पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. देवणी, उदगीर तालुक्यांसाठी शुक्रवारी उर्वरित स्वाध्याय पुस्तके पाठविण्यात आले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाने मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. (प्रतिनिधी) मुख्याध्यापकांवर जबाबदारी...पाठ्यपुस्तकांच्या योग्य नियोजनासाठी त्या-त्या तालुक्यातील अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्या दिवशी पुस्तके पडावीत यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सांगितले.२