२०,७२० प्रवेश क्षमता ; १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण

By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-18T23:55:28+5:302014-06-19T00:21:34+5:30

उस्मानाबाद : मंगळवारी १० वी च्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आहे.

20,720 Entrance Capacity; 17 thousand 842 students passed | २०,७२० प्रवेश क्षमता ; १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण

२०,७२० प्रवेश क्षमता ; १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण

उस्मानाबाद : मंगळवारी १० वी च्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ११ वी प्रवेशासाठी जिल्ह््यातील विद्यार्थी व पालकांची विविध महाविद्यालयात लगबग सुरु झाली आहे. कोणती शाखा निवडावी हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतोच. त्यामुळे यापुढे मिशन अ‍ॅडमिशन सुरु होते. आपण ज्या शाखेत प्रवेश घेणार आहोत त्यांच्या संबंधित जिल्ह्यात, शहरात किती महाविद्यालये आहेत, किती जागा रिक्त आहेत याची उत्सकता सर्वानाच असते. जिल्ह्यातील संयुक्त, कला, वाणिज्य व विज्ञान या अभ्यासक्रमाच्या किती जागा आणि किती तुकड्या याबाबत घेतलेला हा लेखाजोखा.
मागील तीन वर्षापासून जिल्ह्याचा निकाल सातत्याने उंचावत आहे. यावर्षीही तब्बल साडेसात टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. आता या विद्यार्थ्यांचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’ सुरु झाले आहे. जिल्ह््यातही पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड शिक्षण देणारी महाविद्यालयेही नावारुपाला आली आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नामांकीत महाविद्यालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा हळुहळु कमी होवू लागला आहे. मंगळवारी दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांची मिळून २० हजार ७२० इतकी प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थी आणि प्रवेश क्षमतेचा विचार केला असता, किमान पावणेतीन हजार विद्यार्थी कमी पडत आहेत. दरम्यान गतवर्षी १५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनीच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जवळपास ५ हजार ३३२ जागा रिक्त राहिल्या होत्या. हे चित्र बदलण्यासाठी यावेळी महाविद्यालयांना कंबर कसावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
विज्ञान शाखेसाठी ६ हजारावर जागा
जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयात कला, विज्ञान आणि संयुक्त या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या २० हजार ७२० इतक्या जागा आहेत. यामध्ये कला शाखेची प्रवेश क्षमता ११ हजार ८८०, विज्ञान ६ हजार ४८०, वाणिज्य १ हजार ८०० तर संयुक्त अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ५६० इतकी असल्याचे सांगण्यात आले.
मंजूर तुकड्या
कला १३२
विज्ञान ६८
वाणिज्य १७
संयुक्त ०६
एकूण २२३

Web Title: 20,720 Entrance Capacity; 17 thousand 842 students passed