अजिंठा लेणी शोधाला २०७ वर्षे पूर्ण! जॉन स्मिथला वाघाच्या शिकारीतून उलगडले जागतिक आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 20:17 IST2026-04-28T20:16:32+5:302026-04-28T20:17:19+5:30

अजिंठा लेणी २०७ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सापडले वैभव; जॉन स्मिथने २८ एप्रिल १८१९ रोजी जगासमोर आणला अद्भुत वारसा

207 Years of Ajanta Caves Discovery: How a Tiger Hunt Led John Smith to a Global Treasure. | अजिंठा लेणी शोधाला २०७ वर्षे पूर्ण! जॉन स्मिथला वाघाच्या शिकारीतून उलगडले जागतिक आश्चर्य

अजिंठा लेणी शोधाला २०७ वर्षे पूर्ण! जॉन स्मिथला वाघाच्या शिकारीतून उलगडले जागतिक आश्चर्य

जागतिक कलेचा अद्भुत वारसा आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या शोधाला २८ एप्रिल रोजी २०७ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन शतकांपूर्वी एका ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने लावलेला हा शोध आजही जगासाठी एक मोठे आश्चर्य मानले जाते.

याबाबत अधिक माहिती अशी, इंग्रज-मराठा युद्धानंतर इंग्रजांचा वावर अजिंठ्यात वाढला होता. जखमी सैनिकांवर उपचारासाठी येथील भुईकोट किल्ल्यातील बारादरीचा वापर केला जात असे. २८ एप्रिल १८१९ रोजी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा अजिंठ्याच्या जंगलात शिकारीसाठी आला होता. वाघूर नदीच्या पात्राशेजारी वाघाचा पाठलाग करीत असताना, लेणापूर शिवारात त्याला डोंगररांगांमध्ये कोरलेल्या या लेण्यांचे दर्शन झाले. जॉन स्मिथने आपला हा शोध अजरामर करण्यासाठी लेणी क्रमांक १० मधील एका स्तंभावर स्वतःच्या नावासह ही तारीख कोरून ठेवली, जी आजही पर्यटकांना पाहायला मिळते.

अजिंठा लेणीत एकूण २९ लेण्या असून त्या सर्व बौद्धधर्मीय आहेत. यात ५ चैत्य (प्रार्थना स्थळे) आणि २४ विहारांचा समावेश आहे. ३० वी लेणी अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. कलेचा हा अद्भुत आविष्कार पाहून १९८३ साली 'युनेस्को'ने अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला.

१८४४ मध्ये कॅप्टन रॉबर्ट गिल यांची येथील चित्रांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी नेमणूक झाली होती, ज्यांच्या आयुष्यावर आधारित प्रेमकहाणी आजही चर्चेत असते. २०७ वर्षांनंतरही अजिंठा लेणीतील कला आणि सौदर्य जगभरातील पर्यटक व संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनून राहिली आहे.

कला अन् सौंदर्याचा संगम
अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे तत्कालीन संस्कृतीचा आरसा मानली जातात. यामध्ये स्त्री सौंदर्य, प्रसाधने, अप्सरा, राण्या आणि दासींचे अत्यंत कलात्मक चित्रण आढळते. केवळ मानवी आकृतीच नव्हे, तर पशुपक्षी, वृक्ष-वेली, वस्त्राभूषणे आणि राजदरबारातील प्रसंगांचे जिवंत चित्रण या लेण्यांमध्ये पाहायला मिळते.

लेणी सांभाळणे, ही सर्वांची जबाबदारी
६६ अजिंठा लेणी ही हजारो वर्षे निसर्गाने सांभाळली. लहान बाळाला जसे कुशीत सांभाळले जाते, अगदी तसेच. जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने २८ एप्रिल १८१९ रोजी ही लेणी शोधली. त्याने आपले नाव आणि तारीख अजिंठ्यात क्रमांक - १० च्या लेण्यात कोरून ठेवले आहे. ही लेणी सर्वात आधी बनवलेली आहे. ती इतर लेण्यांपेक्षा काहीशी उंचही आहे. ही लेणी सांभाळणे, ही सर्वांची जबाबदारी आहे.
-मनोज पवार, संरक्षण सहायक, अजिंठा लेणी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

Web Title : अजंता गुफाओं की खोज: स्मिथ की आकस्मिक खोज के 207 वर्ष

Web Summary : अजंता गुफाएँ, यूनेस्को विश्व धरोहर स्थल, ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ द्वारा बाघ के शिकार के दौरान उनकी पुनर्खोज के 207 वर्ष पूरे करती हैं। प्राचीन कला और संस्कृति को प्रदर्शित करने वाली ये बौद्ध गुफाएँ दुनिया भर के पर्यटकों और शोधकर्ताओं को आकर्षित करती हैं। इनका संरक्षण एक साझा जिम्मेदारी है।

Web Title : Ajanta Caves Discovery: 207 Years Since Smith's Accidental Find

Web Summary : The Ajanta Caves, a UNESCO World Heritage site, mark 207 years since their rediscovery by British officer John Smith during a tiger hunt. These Buddhist caves, showcasing ancient art and culture, continue to captivate tourists and researchers worldwide. Their preservation remains a shared responsibility.