सलीम अली सरोवर प्रवेशासाठी २० रुपये
By Admin | Updated: August 27, 2014 00:15 IST2014-08-27T00:05:40+5:302014-08-27T00:15:47+5:30
३० ऐवजी २० रुपये प्रवेश शुल्क प्रतिव्यक्ती आकारण्यास सभापती विजय वाघचौरे यांनी मंजुरी दिली.

सलीम अली सरोवर प्रवेशासाठी २० रुपये
औरंगाबाद : डॉ. सलीम अली सरोवर सौंदर्यीकरण करून ते नागरिकांसाठी खुले केल्यानंतर मनपाने प्रवेश शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. ३० ऐवजी २० रुपये प्रवेश शुल्क प्रतिव्यक्ती आकारण्यास सभापती विजय वाघचौरे यांनी मंजुरी दिली. तसेच अपंग व शाळकरी मुलांना उद्यानात सवलतीच्या दरात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.
सदस्य काशीनाथ कोकाटे, मीर हिदायत अली यांनी शुल्कवाढीस विरोध केला. कोकाटे म्हणाले की, राज्य शासनाच्या निधीतून त्या सरोवराचा विकास झाला आहे. सिडको- हडको परिसरातील नागरिकांसाठी ते एकमेव उद्यान मनोरंजनाचे साधन आहे. तेथे होणारी दरवाढ रद्द करण्यात यावी. सरोवरात वाढणारी गर्दी पाहता व मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने १० रुपयांवरून ३० रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर होता.
दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी १० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. वॉर्ड क्र. ३५, बारापुल्ला रोडवर शौचालय पाडून तेथे आरोग्य केंद्र बांधणे, एच.पी. पवार, काझी निशांत अंजूम या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च परतावा देण्याचा आणि पैठणगेट येथील जागा तीन वर्षांच्या भाडेकरारावर देण्याच्या प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली.