शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार लिटरने घटले दूध संकलन

By admin | Updated: May 7, 2015 00:58 IST

संजय तिपाले, बीड शेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे.

 

संजय तिपाले, बीडशेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे. सततचा दुष्काळ, चाराटंचाई व वाढलेल्या उत्पादनखर्चाने शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असून मागील चार महिन्यात शासकीय व खासगी दूध संकलन केंद्रांत मिळून महिन्याकाठी १८ हजार लिटरची घट झाली आहे.जिल्हा एकेकाळी दूधउत्पादनात राज्यभर दबदबा ठेवून होता. धवलक्रांतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य तर दिलेच शिवाय आत्मविश्वासही जागविला होता. दुधापासून बनविल्या जाणाऱ्या तूप, दह्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसेही खेळू लागले होेते. मात्र, दूधउत्पादनाला समस्यांनी घेरल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा अक्षरश: मोडीत काढला आहे. त्याचा थेट परिणाम दूधसंकलनावर झाला आहे. जानेवारी २०१५ मध्ये शासकीय दूध संकलन केंद्रात ७ हजार ९३६ लिटरने वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस दूध उत्पादनात १६ हजार लिटरपेक्षा अधिक घट झाली. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने उत्पादनातील घट १८ हजार लिटरपर्यंत घसरली आहे. चारा, पाण्याची समस्या बिकट बनल्याने जनावरे पोसणे शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दुभती जनावरे देखील बाजारात मांडली जात असून दावणी ओस पडू लागल्याचे निराशाजनक चित्र आहे.