शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

१२४ औषधी दुकानांचे परवाने रद्द

By admin | Updated: July 31, 2014 00:41 IST

परभणी: जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या १२४ औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले असून २५ परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.

परभणी: जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या १२४ औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले असून २५ परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील असल्याची माहिती औषध निरीक्षकांनी दिली.औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा व औषध किंमत नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने १ वर्षामध्ये जिल्ह्यातील ८५० औषधी विक्री दुकानांपैकी ६०१ दुकानांची तपासणी केली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या १७१ दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सहाय्यक आयुक्त व्ही.टी.पौनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी ही कारवाई केली आहे. रजिस्ट्रर्ड फार्मासिस्टचे प्रमाणपत्र औषधी विक्री दुकानांना भाड्याणे देऊन इतरत्र नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या फार्मासिस्टच्या बाबतीत या कार्यालयाकडून कडक कारवाया केल्या जात आहेत. औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी अशा व्यक्तीविरुद्ध वर्षभरात पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत व विना विक्री बिलाने वर्गीकृत औषधींची विक्री करणे, औषध विक्री बिलांचा तपशील न ठेवणे, नशेली व गर्भपात संदर्भातील औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व विना विक्री बिलाने विकणे, विना परवाना होमियोपॅथिक औषधींची विक्री करणे आदी बाबत प्रशासनाकडून कारवाया केल्या जात आहेत. तेव्हा औषध विक्रेत्यांनी योग्य त्या नियमांचे पालन करणे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)