शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेवर १२ इच्छुकांची दावेदारी़़!

By admin | Updated: June 11, 2014 00:26 IST

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत़

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत़ काँग्रेसकडून प्रफुल्ल कांबळे व भाजपाकडून तुषार गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ बसपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली असली पक्षाचा एबी जोडण्यात आलेला नाही़ भाजपाच्या उमेदवारीचा निर्णय अचानक बदलल्याने कार्यकर्त्यांत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता़प्रभाग १३ मध्ये काँग्रेसचे अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता़ दुपारी ३ वाजेपर्यंत १२ अर्ज दाखल करण्यात आली आहेत़ त्यात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल कांबळे यांनी दोन व भाजपाचे तुषार गायकवाड यांनी एक अर्ज दाखल केला आहे़ त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना दत्तू आल्टे, शिवप्रसाद श्रृंगारे, भाजपाकडून जितेंद्र कांबळे, बालाजी शिंदे, नितीश वाघमारे, काँग्रेसकडून राहुल कावळे, बहुजन समाज पार्टीच्या वतीने विजय अजनीकर व दत्तू आल्टे, विठ्ठल भोसले, बालाजी शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे़मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले बसपाचे उमेदवार विजय अजनीकर यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केली आहे़ तसेच भाजपाचे जितेंद्र कांबळे, राष्ट्रवादीचे शिवप्रसाद श्रृंगारे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ एकूण ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ अर्ज माघारी घेण्यासाठी १३ जून शेवटची तारीख आहे़ उमेदवारी दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस असल्याने महानगरपालिकेत सकाळी ११ वाजल्यापासून पक्ष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़ उपमहापौर सुरेश पवार यांच्या दालनात दिवसभर गर्दी होती़ (प्रतिनिधी)‘एबी फॉर्म’साठी काँग्रेस, भाजपाकडून वेटिंग़़़काँगे्रस पक्षाकडे पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी ९ जण इच्छुक होते़ कार्यकर्त्यांकडून बंडखोरी होऊ नये, यासाठी शेवटच्या तासाभरात उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार शेवटपर्यंत इच्छुकांना खेळवत ठेवण्यात आले होती़ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेदे्र,गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहराध्यक्ष अ‍ॅड़ समद पटेल, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी सभापती अख्तर मिस्त्री, विक्रांत गोजमगुंडे, केशरबाई महापुरे, अहेमदखाँ पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ दुसरीकडे भाजपाचे शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीश वाघमारे यांची उमेदवारी जाहीर करून एबी त्यांनाच देण्यात असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले होते़ मात्र, दहा मिनिटांतच तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म घेऊन पोहोचले़ त्यानंतर शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकारी या विषयावर संभ्रमावस्थेत होते़ यावेळी अनिल पतंगे, प्रदीप मोरे, शिवसिंह सिसोदिया, देवीदास काळे, संतोष ठाकूर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते़ मागील निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड़व्यंकट बेद्रे या प्रभागातून निवडून आले होते़ त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे़ गतवेळी ९ उमेदवार रिंगणात होते़ यावेळी कितीजण राहणार, हे १३ जूनला स्पष्ट होईल़