शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

११७ कोटींच्या खर्चास मान्यता

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस खा. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ.जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ चा मार्चपर्यंत ९९.१६ टक्के खर्च झालेला आहे. ज्या विभागाचा निधी अखर्चित आहे त्या संबंधित विभागांनी विकासकामांसाठी देण्यात आलेला निधी संंबंधितांकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन त्वरित खर्च करावा. तसेच या अंतर्गत प्रस्तावित विविध विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. या शिवाय जिल्हा परिषदेने मागील निधी पूर्णत: खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी व अहवाल सादर करावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रात नियमित उपस्थित रहावे. गैरहजर राहणाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मानव विकास कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची सूचनाही केली. प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीतील अनुपालन अहवालावर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या खर्चाचा योजनानिहाय आढावा घेण्यात आला. नियोजन अधिकारी खंदारे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ अंतर्गत सर्वसाधारण योजनेचा मंजूर निधी ७२ कोटी व खर्च ७१ कोटी ९० लाख ४० हजार (खर्चाची टक्केवारी ९९.८७ टक्के), अनुसूचित जाती उपाययोजनेला मंजूर निधी २६ कोटी ५५ लाख व खर्च २५ कोटी ४३ लाख (खर्चाची टक्केवारी ९९.६८ टक्के) व आदिवासी उपाययोजनेला मंजूर निधी २१ कोटी ४९ लाख ९५ हजार (खर्चाची टक्केवारी ९६.११ टक्के) असे एकूण ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार (९९.१६ टक्के) निधी खर्च झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील मागास क्षेत्र विकास निधी २०१४-१५ च्या २९ कोटी ९९ लाख ९८ हजारांचा वार्षिक आराखडा सीईओ बनसोडे यांनी नियोजन समितीकडे सादर केला. या आराखड्यास नियोजन समितीने मान्यता दिली. (प्रतिनिधी)