‘सर्वोपचार’मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे १० संशयित रुग्ण

By Admin | Updated: February 9, 2015 00:45 IST2015-02-09T00:33:49+5:302015-02-09T00:45:05+5:30

लातूर : गेल्या आठ दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एच१ एन१ व्हायरस सक्रिय झाला आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयात १० संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून,

10 suspected cases of 'swine flu' in 'Sampraday' | ‘सर्वोपचार’मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे १० संशयित रुग्ण

‘सर्वोपचार’मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे १० संशयित रुग्ण


लातूर : गेल्या आठ दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एच१ एन१ व्हायरस सक्रिय झाला आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयात १० संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून, ४ पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटी दिली आहे.
लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या आजाराने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एका संशयित रुग्णाचा समावेश होता. एकूण ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील चौघा जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटी दिली आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयात १० रुग्ण संशयित म्हणून उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. रुग्णांनी सर्दी, ताप, खोकला अंगावर न घालता तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातही एका संशयित रुग्णावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

Web Title: 10 suspected cases of 'swine flu' in 'Sampraday'