शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जूनअखेर मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सूट

By admin | Updated: June 6, 2014 01:08 IST

नांदेड : मालमत्ता कराचा आॅनलाईन भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता करात दोन टक्के जादा सूट देण्यात येणार आहे़

नांदेड : मालमत्ता कराचा आॅनलाईन भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता करात दोन टक्के जादा सूट देण्यात येणार आहे़ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मागणी बील आणि कर पावतीचा कागद वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आह़े बील कलेक्टरकडे प्रत्यक्ष रोख किंवा धनादेशाद्वारे कराचा भरणा करणार्‍यांना ही सवलत लागू राहणार नाही़ या सुविधेचा सर्व मालमत्ताधारकांनी लाभ घेऊन आपल्या जबाबदारीसोबतच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले आहे़ २०१४- १५ या वर्षाचा मालमत्ता कर जून २०१४ अखेर भरल्यास मिळणारी ८ टक्के आणि आॅनलाईन भरल्यानंतर २ टक्के अशी १० टक्के सूट मिळणार आहे़ ही सवलत ३० जून पर्यंत सुरू राहणार आहे़ मनपा आयुक्तांनी जानेवारी महिन्यात झोननिहाय घेतलेल्या समाधान शिबिरामध्ये नियमित आणि कराचा अग्रीम भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांनी अग्रीम स्वरूपात एकरकमी वार्षिक कर भरणार्‍या करदात्यांसाठी योजना जाहीर करण्याची मागणी केली होती़ असे केल्यास मनपास वेगवेगळ्या कर्जावर लागणार्‍या व्याजाचा भार कमी होऊन करदात्यांनाही दिलासा मिळेल़ असा प्रस्ताव त्यांनी सुचवला होता़ त्यावर प्रशासनाने विचार करून तो स्थायी समितीकडे पाठवल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजीच्या सभेत सर्वानुमते मंजूर झाला होता़ सन २०१४- १५ या वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी सवलतींचे वेगवेगळे तीन त्रैमासिक टप्पे करण्यात आले आहेत़ एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत आॅनलाईन कर भरल्यास १० टक्के तर जुलै ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते डिसेंबर अशा वेगवेगळ्या कालावधीत आॅनलाईन कर भरणार्‍या मालमत्ताधारकांना अनुक्रमे ७ व ५ टक्के सूट दिली जाणार आहे़ जानेवारी े ते मार्च २०१५ या दरम्यान कर भरणार्‍यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही़ (प्रतिनिधी)