शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात १ ठार; तिघे गंभीर जखमी

By admin | Updated: June 6, 2014 01:10 IST

हिंगोली : भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची आॅटोरिक्षास धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

हिंगोली : भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची आॅटोरिक्षास धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जूनच्या रात्री हिंगोली-सेनगाव रस्त्यावरील खुडज पाटीजवळ घडली असून अपघातात जखमी झालेल्या तिघांवर हिंगोली येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सेनगाव तालुक्यातील तळणी येथील काही भाविक रिधोरा येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी आॅटोमधून जात असताना हा अपघात झाला. तळणीचे गजानन खनपटे, चालक मनोहर खनपटे, जानकाबाई सीताराम खनपटे, वच्छला राजाराम खनपटे (सर्व रा. तळणी), ज्ञानेश्वर बापुराव राखोंडे रा. नालेगाव ता. औंढा नागनाथ) हे सर्वजण आॅटोरिक्षा (क्र. एमएच ३८-५०२१) मध्ये बसून ४ जून रोजी रिधोरा येथे भजनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी निघाले होते. तळणी ते रिधोरा दरम्यान खुडज पाटीजवळ बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हिंगोलीवरून सेनगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहन चालकाने आॅटोला धडक दिली. या अपघातामध्ये आॅटोरिक्षा उलटून त्यातील भाविक जखमी झाले. रात्री परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान भाऊराव मल्हारी कोरडे (वय ३८, रा. तळणी) यांचा मृत्यू झाला. तर जानकाबाई सीताराम खनपटे (७०), वच्छला राजाराम खनपटे (वय ५५, सर्व रा. तळणी), ज्ञानेश्वर बापूराव राखोंडे (३०, रा.नालेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत भाऊराव मल्हारी कोरडे यांच्या पश्चात पाच भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीचे जमादार ए. आर. राठोड, पोकॉ रवी इंगळे यांनी याबाबतची कागदपत्रे नर्सी पोलीस ठाण्याकडे पाठवली आहेत. परंतू गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अज्ञात वाहन चालकावर नर्सी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत भाऊराव कोरडे यांच्या पार्थिवावर तळणी येथे ५ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)सेनगाव तालुक्यातील तळणी येथील काही भाविक रिधोरा येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी आॅटोमधून जात असताना हा अपघात झाला. तळणी ते रिधोरा दरम्यान खुडज पाटीजवळ बुधवारी रात्री हिंगोलीवरून सेनगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहन चालकाने आॅटोला धडक दिली.या अपघातामध्ये आॅटोरिक्षा उलटून त्यातील भाविक जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना हिंगोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेतळणी येथे मयत भाऊराव कोरडे यांच्या पार्थिवावर तळणी येथे ५ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.