जि. प. विषय समित्यांवरही भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:23+5:30

जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व सदस्य एकत्रित राहावे, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मोहुर्ली येथे पर्यटनवारीसाठी गेलेले भाजपचे सर्व ३६ सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या एक तासापूर्वी सभागृहात दाखल झाले.

Z. P. Subject committees also the BJP | जि. प. विषय समित्यांवरही भाजपचे वर्चस्व

जि. प. विषय समित्यांवरही भाजपचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा पराभव : नागराज गेडाम समाजकल्याण तर नितू चौधरी बालकल्याण सभापतिपदी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर गुरूवारी पार पडलेल्या विषय समितीच्या चारही सभापतिपदांवरही विजय प्राप्त करण्यास यश मिळविले. नागराज गेडाम समाजकल्याण सभापतिपदी तर महिला व बालकल्याण सभापती नितू चौधरी तर सभापती म्हणून सुनील उरकुडे व राजू गायकवाड हे विजयी झाले. भाजपच्या उमेदवारांना ३६ तर काँग्रेसच्या उमेदवारांना २० मते पडली.
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व सदस्य एकत्रित राहावे, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मोहुर्ली येथे पर्यटनवारीसाठी गेलेले भाजपचे सर्व ३६ सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या एक तासापूर्वी सभागृहात दाखल झाले. समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन दुग्ध, महिला व बालकल्याण आणि बांधकाम व अर्थ समितीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसकडून ममता डुकरे, नयना गेडाम, प्रमोद चिमूरकर व रिना मालेकर तर भाजपकडून नागराज गेडाम, नितू चौधरी, राजु गायकवाड, सुनील उरकुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पिठासीन अधिकारी खेडकर यांनी उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर हात उंचावून मतदान करण्याची घोषणा झाली. यामध्ये भाजपच्या उमेदवारांना ३६ तर काँग्रेसच्या उमेदवारांना २० मते पडली. भाजपचे जि. प. सदस्य नागराज गेडाम यांची समाजकल्याण सभापतिपदी तर नितू चौधरी यांची महिला व बालकल्याण सभापतिपदी निवड झाली. याशिवाय सुनील उरकुडे व राजू गायकवाड हे सभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात समर्थक सदस्य व भाजप कार्यकर्त्यांनी जि.प. समोर जल्लोष केला.

दोन सभापतींना खातेवाटप
नवनिर्वाचित सभापती सुनील उरकुडे व राजू गायकवाड यांना गुरूवारी खातेवाटप झाले नाही. येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा होणार असून त्यामध्ये घोषणा केली जाणार आहे. उरकुडे यांच्याकडे अर्थ व बांधकाम तर राजू गायकवाड यांच्याकडे शिक्षण व आरोग्य आणि जि. प. उपाध्यक्ष रेखा कारेकार यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात कमळ फुलवले
राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपने जि. प. विषय समित्यांवर पुन्हा एकदा कमळ फुलविले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सभापतींचे मोठे योगदान राहणार आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामुळे विकासकामांना गती येईल, असा दावा भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

Web Title: Z. P. Subject committees also the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.