शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरात युवकांचे हात सरसावले

By admin | Updated: May 16, 2015 01:41 IST

कुष्ठरोग्यांचे मसीहा थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून शुक्रवारी सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला.

मूल : कुष्ठरोग्यांचे मसीहा थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून शुक्रवारी सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला. महारोगी सेवा समितीच्यावतीने आयोजित या श्रमसंस्कार शिबिराला छावणीचे स्वरूप आले असून या शिबिराचा शुभारंभ समाजसेवक डॉ.विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सन १९६७ ला सोमनाथ येथे श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात झाली. त्याची परंपरा कायम असून शिबिराचे हे ४८ वे वर्ष आहे. या शिबिरात राज्यातील अनेक ठिकाणाहून युवकांचे जत्थे आले आले. आतापर्यंत ६५० युवक-युवतींची नोंद करण्यात आली. या श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ श्रमदानाने झाला. २२ मेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात जलसंधारण, मृदसंधारण, शेतीची विविध कामे, त्यांच्या नवनवीन संकल्पना, व्यक्तीमत्त्व विकास व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. नव्या पिढीला संस्कार मिळावे व त्या संस्कारातून देशातील भावी पिढी संस्कारमय निर्माण व्हावी, या उद्देशाने स्व.बाबा आमटे यांनी सुरुवात केलेल्या या श्रमसंस्कार शिबीराचा वसा डॉ.विकास आमटे यांनी हाती घेतल्याचे शिबीर प्रमुख रवींद्र नलगिरवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजच्या युवकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा निर्माण होऊन त्यांना श्रमाची महती कळावी. यातूनच नव्या प्रेरणा व वाटा मिळतील. यासाठी दरवर्षी होणारे हे शिबीर युवकांना प्रेरणादायी ठरते. याच बरोबर देशाविषयी आपुलकी निर्माण करण्याची ताकद या शिबिरातून त्यांना येते, असे या शिबिराचे संयोजक कौस्तुभ आमटे, शितल आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आठ दिवस चालणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिराला युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार असून संस्काराची प्रेरणा नक्कीच मिळेल, असा आशावाद युवकांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)