गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST2020-12-06T04:29:32+5:302020-12-06T04:29:32+5:30

राजुरा : आपले गाव स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी तालुक्यातील मंगी (बु) येथील युवकांनी पुढाकार घेतला आहे. दररोज गावातील ...

Youth initiative for village cleanliness | गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

राजुरा : आपले गाव स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी तालुक्यातील मंगी (बु) येथील युवकांनी पुढाकार घेतला आहे. दररोज गावातील परिसर व रस्त्याची स्वच्छता करण्यात येत असल्याने गाव स्वच्छ व सुंदर दिसत आहेत.

गावातील ग्रामस्थ व अंबुजा सिमेंट फॉउंडेशनच्या सहकार्याने गावातील शाळा, महाविद्यालयाची स्वच्छता, बगीचा निर्माण करण्यात आला असल्याची माहिती मंगीच्या सरपंच रसिका पेंदोर यांनी दिली. गावात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सचिव जी. बी वंजारे, अंबुजा फॉउंडेशनचे व्यवस्थापक श्रीकांत कुमरे, गाव विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम, उपसरपंच वासुदेव चापले, भीमराव पुसाम, रत्नाकर भेंडे, प्रकाश वेंडसे, गुलाब चव्हाण, शंकर तोडासे, सम्भा लाडे, अंबादास चापले, किसन कोडापे, नवनाथ जाधव, श्यामराव येमूलवार आदी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Youth initiative for village cleanliness