शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावरील म्हशीला वाचविण्यासाठी तरुणांनी लावली जिवाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

लखमापूरच्या अलीकडे शुक्रवारी रेल्वेने चार म्हशींना धडक दिली. यातील तीन म्हशी घटनास्थळीच ठार झाल्या तर एक गाभण म्हैस रुळाच्या कडेला तडफडत होती. शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना ती दिसली. त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर  दूरवरून पाणी आणून पाजले. मात्र ती उठत नसल्याने येथील प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांनी माहिती दिली. त्यानंतर ते सदस्यांसह  घटनास्थळी पोहोचले.

ठळक मुद्देप्यार फाउंडेशनच्या सदस्यांचा पुढाकार : मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे सहसा कुणीही बाहेर पडण्याच्या भानगडीत पडत नाही.  मात्र अशाही स्थितीत रेल्वे रुळाच्या कडेला भर उन्हात २४ तासांपासून तडफडत असलेल्या अपघातग्रस्त एका गाभण म्हशीला वाचविण्यासाठी प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी जिवाची बाजी लावून तब्बल तीन तास रेस्क्यू करीत तिला वाचविले. या कामासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर उशिरा का, होईना महापालिका कर्मचाऱ्यांनीही हातभार लावला.लखमापूरच्या अलीकडे शुक्रवारी रेल्वेने चार म्हशींना धडक दिली. यातील तीन म्हशी घटनास्थळीच ठार झाल्या तर एक गाभण म्हैस रुळाच्या कडेला तडफडत होती. शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना ती दिसली. त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर  दूरवरून पाणी आणून पाजले. मात्र ती उठत नसल्याने येथील प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांनी माहिती दिली. त्यानंतर ते सदस्यांसह  घटनास्थळी पोहोचले. मात्र ज्या ठिकाणी ही म्हैस होती त्या ठिकाणी दोन्ही रुळामध्ये तसेच दोन्ही बाजूने दरी असल्यामुळे म्हशीला काढणे मोठे जोखमीचे काम होते. सदस्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना फोन करून जेसीबी तसेच ट्रॅक्टरची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतर मोठ्या प्रयत्नाने म्हशीला काढण्यात यश आले.

थेट मनपा आयुक्तांनी घेतली दखलअप आणि डाऊन रेल्वे रुळाच्यामध्ये अपघातग्रस्त म्हैस असल्याने तिला काढण्यासाठी जेसीबी किंवा क्रेनशिवाय पर्याय नव्हता. अशावेळी सदस्यांसह काही नागरिकांनी महापालिकडे जेसीबी तसेच ट्रॅक्टर  पाठविण्याची मागणी केली. मात्र नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे फाउंडेशनच्या सदस्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना थेट व्हिडिओ काॅल करीत अपघातग्रस्त म्हशीची तडफड दाखविली. आयुक्तांनी वेळ न दवडता आपल्या कर्मचाऱ्यांना जेसीबी तसेच ट्रॅक्टर त्वरित घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर काही वेळातच जेसीपी तसेच ट्रॅक्टर घटनास्थळी पोहचले. 

रात्री १० वाजेपर्यंत चालले रेस्क्यूअपघातग्रस्त म्हैस रेल्वे रुळाच्या कडेला असल्याने तिला काढणे कठीण होते. त्यातच रेल्वेसारख्या धावत असल्यामुळे सदस्यांच्या जिवालाही धोका होता. त्यामुळे मोठी जोखीम उचलून योग्य नियोजन करून तिला बाहेर काढण्यात आले. या कामासाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लागला. 

या सदस्यांनी केली मदतम्हशीला बाहेर काढण्यासाठी प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापल्ली यांच्यासह कुणाल महल्ले, निनाद डोंगरे, अर्पितसिंह ठाकूर, शीतल दुर्गे तर तुळशीनगरातील मधुकर येवले गुरुजी, पांडे गुरुजी, मंगेश ताजने आणि महापालिकेचे उपायुक्त, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, जेसीबीचालक, ट्रॅक्टरचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी या कामासाठी मदत केली

 

टॅग्स :railwayरेल्वे