पाचशेची लाच घेताना लिपिकास अटक

By Admin | Updated: December 31, 2016 02:09 IST2016-12-31T02:09:33+5:302016-12-31T02:09:33+5:30

येथील तहसील कार्यालयातील संकिर्ण विभागाचे कारकून नंदादिप श्रीराम तुमराम (५८) याला

Writing a copy of 500 rupees bribe | पाचशेची लाच घेताना लिपिकास अटक

पाचशेची लाच घेताना लिपिकास अटक

ब्रह्मपुरी : येथील तहसील कार्यालयातील संकिर्ण विभागाचे कारकून नंदादिप श्रीराम तुमराम (५८) याला ५०० रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चमूने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रंगेहाथ अटक केली.
तालुक्यातील गोगाव येथील प्रदीप वामन मेश्राम यांनी नाटकाच्या परवानगीसाठी कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार लिपीक नंदादिप श्रीराम तुमराम यांनी परवानगी देण्यासाठी पाचशे रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापडा रचला असता, तुमराम हे रंगेहाथ सापडले.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मेत्रे, मनोहर एकोणकर, संतोष येलपुलवार, भास्कर चिंचोलेकर यांनी केली. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Writing a copy of 500 rupees bribe