सनप्लॅग कोळसा खाणीत कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:35+5:30

वरोरा तालुक्यातील बेलगाव गावाच्या शिवारात भूमिगत कोळसा खाण असून सनप्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवत आहे. मागील कित्येक वर्षापासून या कोळसा खाणीतून कोळसा काढून वाहनाद्वारे डोंगरगाव येथील रेल्वे साईडिंगवर कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या कंपनीमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत.

Workers' agitation shut down in the SunPlag coal mine | सनप्लॅग कोळसा खाणीत कामगारांचे काम बंद आंदोलन

सनप्लॅग कोळसा खाणीत कामगारांचे काम बंद आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांपासून उत्पादन ठप्प : व्यवस्थापनाला मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सनप्लॅग भूमीगत कोळसा खाण बेलगाव येथील कामगारांनी विविध मागण्याकरिता मागील एक दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने कंपनीचे उत्पादन कार्य ठप्प झाले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केल्याने कंपनी व्यवस्थापन व प्रशासनापुढे तूर्तास पेच उभा ठाकला आहे.
वरोरा तालुक्यातील बेलगाव गावाच्या शिवारात भूमिगत कोळसा खाण असून सनप्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवत आहे. मागील कित्येक वर्षापासून या कोळसा खाणीतून कोळसा काढून वाहनाद्वारे डोंगरगाव येथील रेल्वे साईडिंगवर कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या कंपनीमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत. कामगारांना भूमिगत कोळसा खाणीत काम करावे लागत असल्याने त्यांना कोल इंडियाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे, वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात, कॅन्टींग सुविधा, समान काम समान वेतन देण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात लालझेंडा कोल माईन्स मजदूर युनियनच्या वतीने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सर्वच कामगार सहभागी झाले असल्याने दोन दिवसांपासून कंपनीचे उत्पादन ठप्प झाले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. सनप्लॅग कंपनी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

कोळसा खाण खासगी असली तरी ती खाण कोल इंडियाच्या नियमानुसार चालते. त्यामुळे कोल इंडियाच्या समझोत्यानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. समान काम समान वेतन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
- डी.के. दत्ता, अध्यक्ष, लालझेंडा कोल माईन्स मजदूर युनियन

Web Title: Workers' agitation shut down in the SunPlag coal mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.