शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू

By admin | Updated: May 10, 2017 00:49 IST

चंद्रपूर स्थित मध्यचांदा वन विभागातील सात वनपरिक्षेत्रामधील २२ तेंदूपाने घटकामध्ये तेंदूपाने संकलनाचे कार्य स्थानिक आदिवासी व इतर मजुरांकडून जोमात सुरू झाले आहे.

मध्यचांदा वन विभाग : संकलनकर्त्या मजुरांना सात कोटी मिळणारआनंद भेंडे। लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : चंद्रपूर स्थित मध्यचांदा वन विभागातील सात वनपरिक्षेत्रामधील २२ तेंदूपाने घटकामध्ये तेंदूपाने संकलनाचे कार्य स्थानिक आदिवासी व इतर मजुरांकडून जोमात सुरू झाले आहे. त्यामध्ये संकलनकर्त्या मजुरांना मजुरीपोटी सात कोटी रुपये मिळणार असून मजुरांची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे.वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, यावर्षी तेंदूपाने घटकास कंत्राटदारांनी निर्धारित रक्कमेपेक्षा जास्त रक्कम देवून घटक खरेदी केले आहे. मध्यचांदा वन विभाग चंद्रपूरमधील बल्लारशाह, कोठारी, धाबा, राजुरा, वनसडी, जिवती, विरूर या वनपरिक्षेत्रातील २२ तेंदूपाने घटकातून ३३ हजार ६५७ प्रमाण गोणीचे संकलन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तेंदूपाने गोळा करण्याचा दर १८५ रुपये प्रती प्रमाण गोणी आहे. त्यामुळे या वन विभागातील गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांना काम उपलब्ध होवून कंत्राटदारामार्फत मजुरीपोटी सात कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.तेंदूपाने गोळा करण्यासाठी शहर व खेड्यातील मजूर पहाटेला उठून जंगलात जातात. सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करून घरी येतात त्यानंतर घरातील सर्व लहान मोठी मंडळी एकत्र येवून ७० पानाचे पुडे तयार करतात. ती पाने कंत्राटदाराला देण्यात येतात. या कामात मोठी नगदी रक्कम मिळत असल्यामुळे घरची मंडळी सहभागी होतात. तसेच नातेवाईक सुद्धा येवून यात मदत करतात.तेंदूपाने नैसर्गिक उपज असल्यामुळे यावर वन विभागास कोणताही खर्च करावा लागत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने गोरगरीब नागरिकांचा फायदा लक्षात घेवून तेंदूपाने घटक लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून अंदाजे ६० टक्के रक्कम बोनस रूपात वाटप केली जाते. त्यामुळे मजुरांना मोबदला व बोनस रक्कम मिळत असल्यामुळे घरची मंडळी या हंगामाकडे आकर्षित होतात. मजुरांना या रक्कमेतून पुढील लग्न, शेती व शिक्षणाचा खर्च व इतर कामासाठी आर्थिक मदत होत असते. त्यामुळे या तेंदू हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले असते. यावर्षी मजुरांना मजुरीपोटी ७ कोटी व बोनस म्हणून अंदाजे ६ कोटी असे एकून १३ कोटी रुपये मिळणार असल्यामुळे त्यांची वर्षभराची पुरणपोळीची शिदोरी म्हणून संबोधिल्या जाते. मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी व कर्मचारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.मध्यचांदा वन विभागातील २२ तेंदूपाने घटकातून ३३ हजार ६७५ प्रमाण गोणी संकलन करावयाचे आहे. त्यापोटी मजुरांना मजुरीपोटी सात कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे या वन विभागातील मजुरांची आर्थिक स्थिती बळकत होणार आहे.- गजेंद्र हिरेउपवनसंरक्षक, मध्य चांदावनविभाग चंद्रपूर