गोंडपिपरी येथे महिला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:11+5:302021-02-05T07:35:11+5:30

आक्सापूर : आज स्‍त्रियांनी सर्वच आघाड्यांवर स्‍वतःला सिद्ध केले आहे. तेजस्‍विनी म्‍हणून सर्वच क्षेत्रात त्‍यांनी उत्तुंग भरारी घेतली ...

Women's meeting at Gondpipri | गोंडपिपरी येथे महिला संमेलन

गोंडपिपरी येथे महिला संमेलन

आक्सापूर : आज स्‍त्रियांनी सर्वच आघाड्यांवर स्‍वतःला सिद्ध केले आहे. तेजस्‍विनी म्‍हणून सर्वच क्षेत्रात त्‍यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्‍त्रियांना आर्थिक स्‍वातंत्र्य मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने बचत गटांची चळवळ रूढ झाली. भारतीय जनता पार्टीने महिला मोर्चाच्‍या माध्‍यमातून स्त्रियांच्‍या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍यासाठी पुढाकार घेतला. तळागाळातील शेवटच्‍या व्‍यक्‍तीच्‍या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्‍हावा, यासाठी भाजपा महिला मोर्चाच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्‍या सातत्‍याने प्रयत्‍नरत असतात, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

गोंडपिपरी येथे मकरसंक्रांती उत्‍सव, तसेच जागर स्‍त्रीशक्‍तीचा या महिला संमेलनात ते बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्षा उमा खापरे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, महिला मोर्चाच्‍या प्रदेश उपाध्‍यक्ष वनिता कानडे, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष अल्‍का आत्राम, जि.प. सदस्‍य वैष्‍णवी बोडलावार, स्‍वाती वडपल्‍लीवार, कल्‍पना अवथरे, पंचायत समिती सध्यश भूमी पिपरे, कुसुम ढुमने, भाजप नेते गणपतराव चौधरी, नीलेश संगमवार, साईनाथ मास्टे, चेतनसिंह गौर, राकेश पुन यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

प्रास्‍ताविक अरुणा जांभुळकर यांनी केले, तर संचालन दमयंती वाकडे, मनिषा मडावी, दिवसे यांनी केले. आभार प्रदर्शन अश्विनी तोडासे यांनी केले. यावेळी राखी रासमलवार, प्रियंका रासमलवार, अल्‍का फलके, किरण नगारे, माया वाघाडे, प्रांजली बोनगीरवार आदी उपस्थित होते.

Web Title: Women's meeting at Gondpipri