शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्र्याचा दौरा सार्थक ठरेल काय ?

By admin | Updated: May 6, 2015 01:26 IST

आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

शंकर चव्हाण जिवतीआंध्र-महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै १९९७ रोजी दिल्यानंतरही खुद्द महाराष्ट्र शासनानेच ‘त्या’ १४ गावांना वाळीत टाकले आहे. परिणामी महाराष्ट्राच्या गाफिलपणाचा फायदा घेत आंध्र प्रदेश तेलंगणा शासन आजही या गावांमध्ये आपले अधिपत्य गाजवित आहे. महाराष्ट्राचा अविभाज्य घटक झालेल्या या गावांची दुर्दशा आजही कायम आहे. येथील नागरिकांचे प्रश्न कायमचे निकाली लावू, असे आश्वासन मागील वर्षी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. मात्र आश्वासन हवेतच विरले. आता राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा महाराजगुडा, परमडोली या वादग्रस्त गावातील लोकांशी सोमवारी संवाद साधला. त्यात अनेक गंभीर प्रश्न समोर आले. विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याचे कबूल केले असले, तरी या वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न कायमचा निकाली काढणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पहाडावरील गावांना दुष्काळाचे चटके बसत आहे. उन्हाची लाही-लाही त्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची प्राणांतिक झुंज थांबलेली नाही. दळण वळणासाठी पक्या रस्त्यांची सोय नाही. आरोग्य यंत्रणा तर पुरती कोलमडलेली आहे. दवाखाना आहे, मात्र कर्मचारी नाही. दूरध्वनीची सेवा नाही, जमीन ताब्यात आहे पण मालकी हक्क नाही, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असतानाही महाराष्ट्र शासनाने ठोस भूमिका घेतली नाही. याचाच फायदा घेत (आंध्र.) तेलंगाना शासनाने विकासात्मक कामे केली. आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, जमिनीचे पट्टे दिले आहेत. दोन्ही राज्याची विकास यंत्रणा या १४ गावात राबत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. भाषाप्रांत रचनेनुसार १९५६ च्या फाजल अली समितीने निर्धारीत केलेल्या आंतरराज्य सीमा रेषेनुसार ही १४ गावे महाराष्ट्र राज्यातीलच आहेत. या सर्व गावात माठी भाषिक नागरीक राहतात. त्याची मातृभाषा मराठीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भटाळी भाषिकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र शासन मात्र विकास कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न तातडीने सोडवा अशी मागणी घेवून शासन प्रशासनाची दारे ठोठावली आहेत. अनेक वेळा विधानसभेत १४ गावांचे प्रश्न गाजले आहे. अनेक मंत्र्यांनी आश्वासने दिली. काहीनी प्रत्यक्ष भेट दिली. मंत्र्यांच्या भेटी झाल्या आता तरी या वादग्रस्त गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिवती तालुक्यातील महाराजगुडा, परमडोली या गावांत केलेला दौरा जनतेसाठी सार्थक ठरेल काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.