शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख २२ हजार कुटुंबांचे करणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

ठळक मुद्देराहुल कर्डिले : कृष्ठरुग्ण क्षयरूण शोध व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जागरूकता अभियान १३ ते २८ सप्टेंबर २०१९ दरम्यान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान पोलिओच्या धर्तीवर राबवण्यात येत येत आहे. अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.कुष्ठरोग निर्मूलनाकरीता सर्वेक्षण करणार आहे. निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित उपचार करण्यात येणार आहे. यामध्ये कृष्ठरोग आजारात त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट चकाकणारी त्याच्या त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात पाय यामध्ये अशक्त अशक्तपणा जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातील चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. क्षयरोगांमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवरील गाठी, इत्यादी लक्षणे आढळून येतात. तरी क्षयरोगाचे निदानाकरिता रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे.असंसर्गजन्य आजारात आपले वजन वाजवीपेक्षा जास्त आहे. दारु अथवा तंबाखूचे नेहमी सेवन, कुटुंबामध्ये कोणालाही मधुमेह आणि उच्च रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, स्तनामध्ये गाठ, निप्पल मध्ये पु किंवा रक्तस्राव किंवा स्तनाच्या आकारात बदल, गर्भाशय मुख कर्करोग, अंगावरून पांढरे रंगाचा स्राव व दुगंर्धी, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीमधून रक्तस्त्राव, मासिक पाळी चक्रबंद झाल्यानंतर रक्तस्राव व शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव तसेच तोंडाचे कर्करोग दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे. तोंडामध्ये गाठ किंवा जखम किंवा तोंड उघडताना त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात, अशी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, सहाय्यक संचालक संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश साठे, उमेद अभियानाचे समन्वयक राहुल ठाकरे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य